Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वाळविहीर : पाणी देत नसल्याचा जाब विचारल्याने सरपंच पतीकडून मारहाण

Share

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील वाळविहिर गावातील राजवाडा मधेची वाडी येथील ग्रामस्थांनी आम्हाला पाणी का देत नाही या प्रश्नावर जाब विचारला म्हणून त्यांना महीला सरपंचांच्या पतीराजांनी इतर दोघांच्या मदतीने ग्रामस्थाला बेदम मारहाण केली.

शनिवारी रात्री 8 च्या दरम्यान घरात घुसून केलेल्या मारहाणीत दिलीप दादु दोंदे हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिलीप दादू दोंदे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वाळविहीर ह्या गावातील राजवाडा मधेची वाडी भागात पाणी टंचाई सुरू आहे. गावात पाण्याचा टँकरही सुरू आहे. राजवाडा भागात पाणी मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी काल सरपंच यांच्याकडे पाणी का मिळत नाही, आमची पाण्याची व्यवस्था करा याबाबत विचारणा केली.

या कारणावरून सरपंचांचे पती माजी सरपंच प्रकाश लचके, त्याचे सहकारी माजी सरपंच कचरू ठाकरे, आणि ग्रामस्थ नवसु ठाकरे यांना त्याचा राग आला. ह्या तिघांनी ग्रामस्थ दिलीप दादू दोंदे यांना त्यांच्या वाडीतील घरात घुसून शनिवारी रात्री 8 च्या सुमारास बेदम मारहाण केली. ह्या मारहाणीत दिलीप दादू दोंदे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत घोटी पोलीस ठाण्यात कलम 324 प्रमाणे संशयित आरोपी दोघे माजी सरपंच प्रकाश लचके, कचरू ठाकरे, ग्रामस्थ नवसु लचके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!