Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात फुलला दुर्मिळ वनौषधींचा मळा

Share

घोटी : पावसाचे माहेरघर अशी कायमची ओळख असणाऱ्या इगतपूरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात हंगामात बरसलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा अक्षरशः हिरवाईने नटल्या असुन निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या या डोंगररांगेत वनस्पतीशास्त्र प्रेमीच्यां दृष्टीने दुर्मिळ होत असलेल्या विधिध औषधी तसेच रानफुले बहरली आहेत.

या मनमोहक सुगंधाने इगतपुरीचा परिसर सुंगधाने दरवळत असुन दुर्मिळ वनौषधींच्या खजिन्याने तालुका नटला आहे विविध रानफुले, वनस्पती व वनऔषधी झाडे झुडुपे बघण्यासाठी व सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे विवीध भागातुन अभ्यासक व पर्यटकांची गर्दी होत आहे.
गड किल्ल्याचीं ऐतिहासिक पाश्र्वभूमि असलेल्या इगतपूरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गरम परिसर सर्वश्रुत आहे त्याचबरोबर सहयाद्री पर्वतरांगेत विविध प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती याभागात नेहमीच दिसुन येत होत्या मात्र गेल्या पाच सहा वर्षापासुन या भागातही पर्जन्यमान बिघडल्यामळे काही वनस्पती व दुर्मिळ औषधी झाडझुडुपे लुप्त होत चालल्या होत्या यंदा मात्र बहारदार पावसामुळे रानफूलांसह औषधी वनस्पतींचा जणु काही खजिनाच उदयास आला आहे

यंदाच्या हंगामात गावठी वनस्पती व वनऔषधीमध्ये तिरडा ,हिरडा,बेहडा, बेल ,फालगम,अजनी,भुरणी यांचा समावेश आहे तर फूलांच्या प्रजातीमध्ये लॅमिअँसी कुळातील रानतुळसही येथे पहायला मिळत आहे तसेच लिलीअँसी व अस्कलेपिडॅसी कुळातील ग्लोरीअसा सिरोपेजिया,बार्बाटस,कोमेलिना,सुपर्बा फुले असणारी आतिशय मनमोहक अशी फुले व वनस्पती येथे बघायला मिळत असल्याने निसर्ग व वनस्पतीप्रेमी इकडे फिरकत आहेत

इगतपूरी त्र्यंबक म्हणजे सौदंर्याची खाणच : राज्यातील सातारा जिल्हयातील सौंदर्याची खाण म्हणुन ओळख असलेल्या कास पठाराप्रमाणेच विविधि प्रकारची रानफुले सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या सौंदर्यात भर घालत आहेत त्यात देव तेरडा ,जंगली लॅव्हेडंर, गोकर्णां, पिवळी विळवण, मेनमुळ, हिरेशिर, कानवेल, सागकी वासुकी, अंबूशी, केना पानवेल, देव केवडा, तिलोनी, हमाना, रानझेनिया सोनकी इत्यादी रानफूलांचा समावेश आहे

दुर्मिळ वनस्पतींच्या जतनासाठी पुढाकार गरजेचा : केंद्र शासनाने नव्याने तयार केलेल्या आयुष विभागाच्या मंत्रालयानें व पर्यटन विभागाने याबाबतीत इगतपुरी त्र्यंबक मधील या दुर्मिळ वनस्पती, वनऔषधी व रानफुले जतन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे वनस्पतीशास्त्र व निसर्गप्रेमी व अभ्यासकांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!