Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी एम. जे. प्रदीप चंद्रन, तर एस. भुवनेश्वरी नाशिकच्या नव्या जि. प. सीईओ

Share

नाशिक | प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना पदोन्नती मिळाली असून ते भंडारा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतील.नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यवतमाळच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी भूवनेश्वरी एस.यांची नियुक्ती झाली आहे.भूवनेश्वरी या सन 2015 बॅचच्या आयएएस ऑफीसर आहेत.

तर नाशिकच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी एम. जे. प्रदीप चंद्रन यांची वर्णी लागली आहे. प्रदीप चंद्रन हे अमरावतीचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त होते.

डॉ.नरेश गिते यांची 6 फेब्रुवारी 2018 रोजी नाशिक जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. डॉ. गिते यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून, मुख्यालयातील कामकाजात आमुलाग्र बदल केले. सर्व विभागातील न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयीन कक्ष स्थापन केला. तसेच सर्व विभागातील ई-निविदा एकाच ठिकाणाहून काढण्यासाठी निविदा कक्ष कार्यन्वीत केला.

जिल्हयातील कुपोषणाची खरी आकडेवारी काढण्यासाठी त्यांनी थेट तालुकास्तरावर जाऊन कर्मचार्‍यांशी संवाद साधत गांधीगिरी केली होती. यातून जिल्हयातील कुपोषणाची खरी आकडेवारी समोर आली. त्यानंतर कुपोषण मुक्तीचा नारा देत शासनाने बंद झालेले ग्राम बालविकास केंद्र सुरू करत, कुपोषीत बालकांना पोषण आहार सुरू केला. त्यामुळे कुपोषणाची आकडेवारी कमी झाली. कुपोषणमुक्तीचा हा पॅटर्न राज्यभर राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला.

जि.प. च्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना शासनाकडे पाठपुरावा करत पहिल्या टप्यात 25 कोटींचा निधी पदरात पाडून घेतला. डॉ. गिते यांच्या कारकिर्दीत स्वच्छ सर्वेक्षणात जि.प. चा दिल्लीत गौरव झाला होता. तसेच पोषण आहार व घरकुल योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचा शासनाने पुरस्कार देऊन गौरव केला होता. सहा महिन्यांपासून डॉ. गिते यांची पदोन्नती होणार असल्याची चर्चा होती. परंतू, शासनाने निवडणुकांच्या तोंडावर रखडलेल्या 26 आयएसएस अधिकार्‍यांना पदोन्नती दिली. यात डॉ. गिते यांची भंडारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!