‘होली क्रॉस’मध्ये झाडाच्या कत्तलीचा निषेध करत श्रध्दांजली

0

नाशिक । त्र्यंबक नाक्यावरील होली क्रॉस चर्चच्या संस्थापकांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाची कत्तल झाल्याने त्या निषेधार्थ या झाडाला आज (दि.16) सायंकाळी नागरिकांच्या उपस्थितीत श्रध्दांजली वाहण्यात आली. वृक्ष हे जीवनरक्षक असून त्यांचे संरक्षण झाले पाहिजे. यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती केली पाहिजे, असा सूर निषेध सभेत उमटला.

चर्चचे संस्थापक फादर ज्योकिम बारांको यांनी 1967 मध्ये लावलेले आंब्याचे झाड 50 वर्षांचे होते. झाडाप्रति चर्चशी निगडित ख्रिस्ती कुटुंबांच्या तेव्हापासून आहेत. चर्चच्या मालकीच्या जागेतील आंब्याचे झाड अज्ञात व्यक्तीने मुळासकट तोडून त्याची विल्हेवाट लावली. पुरावा नष्ट करण्यासाठी झाड होते त्याजागी सिमेंट क्रॉक्रीटीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी य ठिकाणी झाडे नव्हतेच असा संभ्रम निर्माण होत आहे. झाड असलेल्या जागेवर पेट्रोलपंपाचे अतिक्रमण आहे.

झाड तोडल्याने चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर वेन्सी डिमेलो यांनी ‘माझ्या आंब्याच्या झाडाची हत्या’ या नावाने संदेश प्रसारित करत चर्चशी निगडित ख्रिस्ती कुटुंबे, समाजप्रेमी आणि पर्यावरणस्नेहींसह श्रध्दांजली सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद ख्रिस्ती कुटुंबे, समाजप्रेमींसह सर्व स्तरातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते. ओझन दिनाचे औचित्य साधत वृक्षतोडीचा निषेध करण्यात आला. चर्चमध्ये प्रथम प्रार्थना झाली त्यानंतर झाडाला श्रध्दांजली वाहण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*