केंद्र शासनाच्या स्वच्छता करंडक स्पर्धेत हेमलता भामरेंना पुरस्कार

0

नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ अभियानांतर्गत स्वच्छ संकल्पना, स्वच्छ सिद्धी या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ भारतासाठी माझे योगदान या संकल्पनात्मक निबंध स्पर्धेत नाशिक महानगरपालिकेच्या चुंचाळे येथील मनपा शाळा क्रमांक ७२ च्या उपक्रमशील शिक्षिका हेमलता भामरे यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरावर विजयी झालेल्या व राज्य पातळीसाठी निवड झालेल्या सर्वोत्कृष्ठ संकल्पना विजेत्यांचा जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सन्मान करण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय उपायुक्त सुखदेव बनकर, जि.प. उपाध्यक्ष नयना गावित, आ.दिपिका चव्हाण यांच्या हस्ते हेमलता भामरे यांचा यांचा रोख रक्कम रुपये दहा हजार , सन्मान चिन्ह , सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला.

स्वच्छ शाळा व मराठी विज्ञान परिषदेच्या स्वच्छता प्रकल्पाचे सादरीकरण हे उपक्रम भामरे यांनी राबविलेले आहेत. त्यांच्या ह्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, मुख्याध्यापिका रोहिणी तिडके व शिक्षकानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*