Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Share

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरु असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान दोन दिवसांपासून नाशिकसह पुणे येथे जोरदार पाऊस झाला असून आज पुन्हा विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस पुढील दोन दिवस अशाच प्रकारे कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तसेच धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव या ठिकाणी देखील पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!