Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात काही भागाला जोरदार पावसाचा फटका

Share

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहर व परिसरात आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर नाशिकसह दिंडोरी,मालेगाव,नांदगाव,निफाड, येवला आदी तालुक्यात पावसाचे पुनश्च जोरदार आगमन झाले आहे.दरम्यान,पावसाचा जोर अधिक असल्याने टोमॅटो,द्राक्ष बागांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता असून भाजीपाल्यावरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असून काही भागाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील टोमॅटो पिकांसह द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे.वणी परिसरामध्ये तर मग़ळवारी अडीच तासात 56 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.त्यामुळे या भागात शेतकर्‍यांच्या पिकांचे विशेषत: द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अशीच परिस्थिती लासलगाव परिसरातही जोरदार पावसामुळे झालेली आहे.वणी येथील झालेला पाऊस हा ढग फुटी सदृष्य झाला.त्यामुळे परिसरातील गावांमध्ये शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

पावसामुळे टोमॅटो व द्राक्षे या नगदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला शेतकरी हवालदिल आहे. या परिसरातील द्राक्ष बागांंमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.द्राक्ष घडांमध्ये पाणी जिरून पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष पिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. याचा परिणाम रोगाचे प्रमाण वाढण्यावर होणार आहे.टोमॅटो पिकालाही याामुळे फटका बसणार आहे.

ज्या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे.त्या परिसरातील द्राक्षबागांवर डाऊनी व भुरी रोगाचे सावट असणार आहे.या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शेतकर्‍यांना आता प्रतिबंधात्मक उपाय करावा लागणार आहे.यामुळे खर्चात वाढ होणार आहे.
-सोमनाथ काळे,शेतकरी

जोरदार पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये चिखलाचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात झाले असून मशागत करताना अडचणी येत आहेत.शिवाय औषध फवारणीलाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.टोमॅटो पिकावर करपा रोगाचा तसेच नागअळी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.परिणामी या दोन्ही नगदी पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे.
-राजेश कदम,शेतकरी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!