Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिवाळी खरेदीवर पावसाचे सावट; राज्यात पुढील चार दिवस मुसळधार

Share

नाशिक : राज्यात उष्णतेची लाट असली तरी पुढील चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान दिवाळी तोंडावर आली असतांना पावसाळा समाप्तीनंतरही महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये दि. १८ ते २१ या चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याने सतर्कतेचा इशाराही विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्यामार्फत देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  • १८ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
  • १९ ऑक्टोबर- मध्य महाराष्ट्रात (नासिक) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
  • २० ऑक्टोबर- मध्य महाराष्ट्रात (नाशिक) तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
  • २१ ऑक्टोबर- मध्य महाराष्ट्रात (नाशिक ) तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

शेतकऱ्यांसाठी सल्ला 

संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट आहे. शेतकर्यांनो पिके सांभाळा, पाऊस नोव्हेंबर पर्यंत लांबण्याची शक्यता.  खरीपाच्या काढणी योग्य पिक पावसाने नासण्यापूर्वी काढणी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक. काढलेले पिक पाण्यात भिजणार नाही इतक्या सुयोग्य उंचीवर कोरड्या जागी साठवणूक करावी. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी रब्बी पिके उशीरा पेरणी करावी. आपल्या भागातील पाऊसमान पाहून व तारतम्य बाळगून मगच रब्बी पिकाच्या पेरणीसाठी निर्णय घ्यावा.

किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!