Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राज्यात गुरुवारपासून पावसाचे जोरदार कमबॅक

Share

नाशिक : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातून मान्सून गायब झाल्याचे संकेत मिळाले होते. तसेच मागील दोन, तीन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस थांबला आहे. पण गुरुवारपासून पुन्हा वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने राज घेतल्यानंतर सध्या राज्यात तापमान वाढलेले दिसून येत आहे. परंतु राज्यात पुन्हा वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतांना परतीचा पाऊस सक्रिय होणार असल्याने पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

तसेच मुंबई मध्ये १९ ते २० या दोन दिवस हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. तर १८ ते २० दरम्यान पुणे येथे जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र्र मध्ये ऑक्टोबरच्या सुरवातीला माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा सक्रिय होणार असून मराठवाडा, कोकण, गोवा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!