Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळ’धार’; पिकांचे नुकसान

Share

नाशिक : शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसांनंतर आज पुन्हा शहरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले तर शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सिन्नर, दिंडोरी या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मूसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे, तळेगाव दिंडोरी, ढकांबे, ओझे, करंजवण ,नळवाडी, निगडोंळ, म्हेळूस्के, लखमापूर, खेडले, पिंपरखेंड, नळवाडपाडा, कादवा माळूगीसह तालुक्यात मुसळधार पाऊस चालू असून टोमॅटोचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकरी वर्गामध्ये पाऊसामुळे चिंतेचे वातावरण आहे. तसेच सिन्नर , देवपूर , जानोरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने या भागातील नाले व नद्यांवरील छोट्या पुलांवरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. तसेच या पावसामुळे ग्रामीण भागातील पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

शहरातील सातपूर, कॉलेज रोड, सराफ बाजार, फुल बाजार परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली असून या ठिकाणी पाणी साचल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!