Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : विभागातील आरोग्यपथके कोल्हापूरला रवाना; १५ डॉक्टरांचा समावेश

Share

नाशिक । प्रतिनिधी
पुराने हाहाकार माजवलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांच्या मदतीला नाशिक विभागातील आरोग्य पथके सज्ज झाली आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 7 तर नगर जिल्ह्यातील 8 अशा 15 वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.

नाशिक जिल्हा पुरातून सावरत असून जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात आरोग्य विभगाने युद्धपातळीवर सुविधा पोहचल्या आहेत. परंतु नाशिक जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून तेथे आरोग्याचे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नाशिक विभागातील आरोग्य यंत्रणेने कोल्हापूर पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पथकासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालये, विभागीय संदर्भ रुग्णालय, प्रांतिक आरोग्य केंद्र यातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके रविवारी कोल्हापूरसाठी रवाना होत आहेत. या पथकांसमवेत प्राथमिक उपचार व आप्तकालीन स्थितीत अतिदक्षतेचे साहित्य आहे. तर आवश्यक औषोधपचाराचा साठा कोल्हापूर येथून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील पथकातील अधिकर्‍यांना त्या-त्या आरोग्य अधिकार्‍यांनी तात्पुरते कार्यमुक्त केले आहे.

अशी आहेत पथके
नाशिक : डॉ. संजय पवार (खेड), डॉ. अनंतकुमार गायकवाड (विसंसेरू), डॉ. प्रदीप जायभावे (जातेगाव), डॉ. गिरीश देवरे (कळवण), डॉ. प्रसाद साळुंखे (कोशिंबे), डॉ. सुरेश पाटील (कावनई), डॉ. चैतन्य बैरागी (पांगारणे).

अ. नगर : डॉ. उन्मेश लोंढे, डॉ. गोविंद लोहकरे, डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. श्रीधर गाजरे, डॉ. नीलेश पारखे, डॉ. रवीद्र गोर्डे, डॉ. भूपेश शिंदे, डॉ. कौत्सुभ शेवंते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!