Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गाव सोडताना ग्रामसेवकाचेही डोळे पाणावले; ग्रामस्थांकडून यथोचित सन्मान

Share

हतगड | लक्ष्मण पवार

सुरगाणा तालुक्यातील हतगड ग्रुप ग्रामपंचायतीत विकास अहिरराव हे ग्रामसेवक नियुक्तीवर होते. त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागाने हतगड, घागरबुडा, ठाणापाडा, पायरपाडा, सुळपाडा, गायदारपाडा आदी गावांना पूर्ण ग्रामपंचायत सदस्यांना संगमताने विकास कामे केली.

गावाचा कायापालट झाला. अत्यंत मनमिळाऊपणाने त्यांनी विकासकामे केली. परंतु त्यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या बदलीने दु:ख तर झाले होतेच. मात्र, गावाचा कायापालट करणाऱ्या ग्रामसेवकाचा यथोचित सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच देविदास गायकवाड, सदस्य -पुंडलिक पवार, रंगनाथ पवार, काळू गवळी, हिरा गावित, राधा खंबाईत, वंदना बागुल, अक्का पवार ,गिरजा मोहन, दळवी व नवीन ग्रामसेवक भोये.आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!