Type to search

Breaking News Featured Special आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video : ग्राउंड रिपोर्ट | परमोरीवरील जखम ओलीच; बिबट्याचे भय संपत नाही..

Share

तीन वर्षीय बालिकेला आई समोरून उचलून नेणारा बिबट्या.. धक्क्याने अद्यापही अंथरूणास खिळलेली माता, दुःखाने बेहाल झालेले आणि डोळ्यातून सतत अश्रुंच्या धारा वाहत असलेले बालिकेचे पिता, दहशतीने बोबडी वळलेले प्रत्यक्षदर्शी आणि आजूबाजूला अजूनही असलेला बिबट्यांचा वावर, अशा दहशतीच्या तसेच हादरलेल्या अवस्थेतून, पाचदिवसानंतरही परमोरीचे ग्रामस्थ सावरलेले नाहीत. येथे घडलेल्या थरारक घटनेनंतर देशदूतच्या टिमने गावात घटनेचा आढाव घेत सादर केलेला ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक । गौरव परदेशी/अभिषेक विभांडीक
दिंडोंरी तालुक्यातील परमोरी येथे गुरुवार (दि.14) शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. सायंकाळच्या सव्वापाच वाजेच्या सुमारास वरखेडारोड वरील मॅकडॉल कंपनी लगत असलेल्या वस्ती नजीक शेतात काम करीत असतांना आईसोबत पाठीमागे असलेली तीन वर्षीय कावेरी प्रकाश गांगोडे हिच्यावर बिबट्यांने अचानकपणे हल्ला करून उसाच्या शेतात फरफटत नेत ठार केले.

या घटनेची दहशत अद्यापही परमोरी ग्रामस्थांवर आहे. घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी तसेच घटना घडली, त्या शेताचा मालक दीपक साळवे यांनी सांंगितले, गुरुवारी गांगोडे कुटुंबीय आपल्याकडे नेहमी प्रमाणे रोजंदारीसाठी कामाला आले होते. प्रकाश गांगोडे हे समोरील शेतात निंदणीचे काम करत होते. तर कावेरीची आई कावेरीसह पुदिना काढणीचे काम करत होती. 25 ते 30 फुटांवरील वस्तीवरून आईने श्रेाला मोबाईल आणण्यास सांंगितल्याने निरागस तीन वर्षाची कावेरी शेतातील रस्त्यावरून खेळत बागडत निघाली.

आईपसून अवघे दहा ते बारा फुटावर ती गेली असेल तोच बिबटयाच्या डरकाळीचा आवाज आला. तीच्या आईसह आम्ही सर्वजनांनी आवाजाकडे पाहताच सर्वच गर्भगळीत झालो. तीची आई जागीच बेशुद्ध पडली. बिबट्याने झडप घालून गव्हाच्या शेतातून कावेरीला फरफटत नेहण्यास सुरूवात केल्याचे पाहताच आम्ही हाताशी जे काही लागेल ते घेऊन आरडाओरड करत 20 त 25 जन त्याच्या मागे पळालो. परंतु त्यांने ऊसाच्या शेतात धुम ठोकली. आम्ही शोध घेतल्याननंतर काही अंतरावर कावेरी मृतअवस्थेत आढळून आली.

अगदी काही अंतरावर डरकाळी टाकत निरागस बालिकेवर झडप घालणारा आक्रमक बिबट्याचे चित्र व ती घटना अद्यापही आपल्या डोळ्यासमोरून हालत नाही. तर आजही आपल्या मनातील भिती गेलेली नाही. साळवे यांनी प्रत्यक्ष बिबट्याने कावेरीवर हल्ला केलेले ठिकाण तसेच तीला गव्हाच्या शेतातून ओढत नेलेला माग दाखला. एका ठिकाणी कावेरीने त्या दिवशी घातलेला पायजमा अद्यापही त्या ठिकाणी पडल्याचे दिसत आहे. यामुळे ती घटना पुन्हा डोळ्यासमारे उभी राहत असल्याचे साळवे यांनी सागिंतले.

कावेरीचे वडिल प्रकाश गांगोडे यांच्याशी बोलताच त्यांच्या डोळ्यांना आश्रृच्या धारा लागल्या, लाडकी लेक आपल्या डोळ्यांसमोर बिबट्याने ओढून नेहल्याचे दुःख काय असते हे एका पित्यालाच माहित. आमच्या घरात तीन पिढ्यांनंतर मुलगी जन्मली होती. पाच भावंडात ती सर्वात लहान होती यामुळे सर्वांचा तिच्यावर खूप जीव होता. रडता रडताच त्यांनी माझ्या छकुलीला बिबट्यानने ओढत नेले इतकेच शब्द फुटले आणि त्यांचा पुन्हा अश्रूंचा बांध फुटला. कावेरीच्या घरात डोकावले असता तीची आई अद्यापही त्या धक्यातून सावरलेली नाही. त्या अंथंरूणाला खिळल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांनी चार दिवसांपासून जेवन खाने सोडून दिले आहे.

सतत चक्कर येऊन त्या पडत असल्याचे बाजुच्या महिलांनी सांगीतले. दरम्यान इतर ग्रामस्थांशी बोलताना त्यांनी बिबट्याच्या दहशतीने शेतकरी तसेच गावातील कोणी सायंकाळ नंतर घराबाहेर पडायलाही भित असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांनी शेतात जे काही काम असेल ते दिवसा व एकदोघांच्या उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे. रात्री कोणीही शेतीकडे फिरकत नाही.बिबट्याच्या दहशतीच्या पगड्याने आता दहा वर्षाआतील बालकांना वडिलधारे घरातच कोंडून ठेवत जात असल्याची सद्य स्थिती गावात आहे.

मतदानावर बहिष्कार
बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ संतापले असून त्यांचा बंदोबस्त केला नाही तर संपुर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे गावचे सरपंच तसेच इतर ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगीतले. बिबट्याच्या दहशतीने मतदानावर गावानेच बहिष्कार टाकण्याचा प्रकार देशात प्रथमच घडत असल्याने याची मोठी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

पिंजरा

पिंजरे बिनकामाचे
घटना घडल्यानंतर वन विभागाने या परिसरात 3 पिंजरे शेतात ठिकठीकाणी बसवण्यात आले आहेत. मात्र सावध झाल्याने एकही बिबट्या पिंजर्‍यात जात नसल्याचे आढळून येत आहे. उलट बिबटे पिंजर्‍याच्या बाजुने तसेच काही वरती चढून बसल्याचे नागरीकांना दिसले आहे.

वर्षभरात 4 बालकांचा मृत्यु
दिंडोरी वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात बालकांचा मुत्यु झाला असल्याची ही चौथी घटना घडली आहे. तर हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची चार दिवसापूर्वीच मातेरेवाडी परिरसरात घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.

अजुन किती बळी घेणार

दररोजच्या बिबट्याच्या त्रासाने ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत. बालिकेवर हल्ल्याची माहिती दिल्यानंतर तब्बल 17 तासानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. असा प्रतिसाद असेल तर नागरीकांनी जगायचे कसे
– बाळासाहेब काळोदे, सरपंच परमोरी

 

शेती कशी करायची

काहीही झाले तरी शेतीची कामे ही करावीच लागतात. यापुर्वी बिबट्याने नागरीकांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अद्याप ते मोकाटच असल्याने शेती करणे अवघड झाले आहे.
– अनिल दिघे, ग्रामस्थ

(शब्दांकन – खंडू जगताप)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!