Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

video : ग्रीन जिमची तरुणाईला भुरळ

Share

नाशिक | श्वेता खोडे / गुंजन दुसानिस

सध्या शहरात ग्रीन जिम आणि योगा कडे वृद्धांबरोबरच तरुणवर्गाचे ही आकर्षण आहे. ग्रीन जिम ही आगळीवेगळी संकल्पना आहे तर योगा म्हणजे फक्त योगासने, ध्यान व हसणे नाही.

ग्रीन जिममुळे सकाळच्या व सायंकाळच्या व्यायाम करता खास उद्यानात व्यायामाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रीन जिममुळे दिवसभरातील थकवा, ताणतणाव तसेच मोकळ्या हवेत प्रसन्न वाटावे यासाठी आजचे वृद्ध व तरुणवर्ग मोठया प्रमाणात आकर्षित होताना दिसतात व वृद्धांबरोबरच आजची तरुणपिढी ही योगाचे प्रशिक्षण घेताना दिसून येत आहे.

योगामुळे वजनात घट, ताणतणावापासून मुक्ती, अंतर्यामी शांतता. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होण्यास मदत होते. पण सध्याच्या  धावपळीच्या जीवनात शरीराकडे व आरोग्याकडे लोकांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपले शरीर व आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी ग्रीन जिम व योगाकडे अनेकजण लक्ष्यकेंद्रीत करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून अनेकजण याकडे लक्ष देत आहेत.

तसेच फिटनेस ही संकल्पना आता प्रत्येकाच्या अंगवळणीत पडू लागली आहे. अर्थात ग्रीन जिम मध्ये व्यायाम करण्याचे वेगवेगळे फ़ंडे आहेत. आजची तरुणपिढी व वृद्ध आपले शरीर व आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगा व जिम कडे वळतात त्यामुळे त्यांना दिवसभरातील थकवा, ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परंतु सध्याचे तरुण प्रायव्हेट जिमकडे मोठ्या प्रमाणात जाताना दिसतात. त्यामुळे त्यांचे फक्त शरीराचा व्यवस्थित राहते परंतु त्याचे परिणाम त्या व्यक्तींना जिम सोडल्यावर जाणवू लागतात. तसेच नियमित योगा केल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य वाढते.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या स्वतःला फिट ठेवायचे असेल तर योगा आणि ग्रीन जिम केल्याने लोकांना निर्माण होणारी अशांतता कमी करण्यास फायद्याचे ठरेल व लोकांना होणाऱ्या मानसिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज लोक आपल्या कामामधून वेळ काढून योगा क्लासेस व ग्रीन जिमसाठी उद्यानामध्ये जातात.

आताच्या तरुणांनी योगा करणे गरजेचे आहे. योगा केल्यामुळे त्यांच्या शरीराबरोबरच मनही प्रसन्न होण्यास मदत होते. वृद्धांचे आरोग्य व्यवस्थित राहते त्यामुळे योगा व ग्रीन जिम करणे फायद्याचे ठरेल.
– डॉ. प्राजक्ता पाटील

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!