Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शेतकर्‍यांना सुमारे दिड कोटीचा गंडा घालणारा व्यापारी जेरबंद

Share

नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे दिड कोटीचा गंडा घालून सौदी अरेबियात फरार झालेल्या संशयित व्यापार्‍यास नाशिक शहरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. यामुळे फसवणुक झालेल्या शेतकर्‍यांना त्यांचे पैसे परत मिळण्याची अशा निर्माण झाली आहे.

योगेश रामकृण शिरसाठ (रा. बहादुरी, ता.चांदवड, जि.नाशिक) असे अटक करण्यता आलेल्या संशयित व्यापार्‍याचे नाव आहे. चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील योगराज एक्झीम एंटरप्रायझेस कंपनीचे द्राक्ष व्यापारी योगेश रामकृण शिरसाठ याने जानेवारी 2019 मध्ये वडनेर भैरव तर मे 2019 पर्यंत ओझर हद्दीतील खेडोपाडयांवरील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे द्राक्ष माल खरेदी केला होता.

यावेळी त्याने शेतकर्‍यांना पुढील काही महिन्याचे धनादेश दिले होते. मात्र सुरूवातीच्या शेतकर्‍यांचे धनादेश न वटल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेत नोटीस बजावली होती. पंरतु शिरसाठी याने शेतकर्‍यांना द्राक्ष मालाचे पैसे न देता मे महिन्याच्या अखेरीस अचानक गायब झाला. त्याने सुमारे 1.5 कोटी रूपयांची फसवणुक केली होती. याबाबत वडनेर भैरव पालीस व ओझर पोलीस ठाण्यात शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

योगेश शिरसाठ याचा शोध घेण्यासाठी समेलगतच्या जिल्हयांमध्ये तपास पथके पाठविण्यात आली होती. दरम्यान 9 जुन रोजी मिळालेल्या माहितीनुसार शिरसाठ हा काही दिवसांपुर्वी सौदी अरब देशातुन परत आल्याची गोपनीय बातमी मिळाली होती.तसेच तो नाशिक शहरातील सातपुर व खुटवडनगर परिसरात वास्तव्यास असल्याचे समजले त्यावरून स्थागुशाचे पथकाने त्यास सापळा रचुन मायको सर्कल परिसरातुन ताब्यात घेतले आहे.

अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक शार्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोहवा कैलास देशमुख, पोकॉ हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदिप लगड, कैलास मुंढे, सचिन गरूड यांचे पथकाने ही कामगिरी केली.

सौदी अरेबिया, उत्तर प्रदेशात वास्तव्य
संशयित योगेश शिरसाठ हा गुन्हा घडल्यापासुन सौदी अरेबिया देशासह उत्तर प्रदेश राज्यात आपले अस्तित्व लपवुन राहत होता. त्याच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेले स्थागुशाचे पथक 2 दिवसांपासुन नाशिक शहरात दबा धरून बसले होते, सातपुर, नवीन नाशिक व खुटवडनगर परिसरातील लॉजेस व हॉटेल्स् तपासण्यात आली होती अखेर एका लॉमध्ये तो आढळून येताच त्यावर झडप घालून त्यास जेरबंद करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!