Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीअंती उमेदवारांना मिळाली 'इतकी' मतं

नाशिक पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीअंती उमेदवारांना मिळाली ‘इतकी’ मतं

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting)आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. त्यानंतर सुरुवातीला मतपत्रिकांची छाननी करून वेगवेगळे गठ्ठे करत २८ टेबलांवर मतमोजणी सुरु आहे…

- Advertisement -

नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीची मतमोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर केला आहे.

पहिल्या फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे :

सत्यजित सुधीर तांबे -15784

शुभांगी भास्कर पाटील -7862

रतन कचरु बनसोडे-560

सुरेश भिमराव पवार-225

अनिल शांताराम तेजा-28

अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर-51

अविनाश महादू माळी -268

इरफान मो इसहाक-18

ईश्वर उखा पाटील-45

बाळासाहेब रामनाथ घोरपडे-142

ॲड. जुबेर नासिर शेख-54

ॲड.सुभाष राजाराम जंगले-46

नितीन नारायण सरोदे-63

पोपट सिताराम बनकर-24

सुभाष निवृत्ती चिंधे-46

संजय एकनाथ माळी-43

वैध मते : २५,२५९

अवैध मते : २,७४१

हभप बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे निधन

मतमोजणीच्या सुरुवातीला टेबल नंबर १३ वर मतदार प्रतिनिधींची संख्या वाढल्याने गोंधळ झाला होता. मात्र, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी तात्काळ पोलिसांच्या तुकडीला पाचारण करून दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना बाहेर काढले. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरु झाली.

मोठी बातमी! नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे आघाडीवर

दरम्यान, यासोबतच बाद मतपत्रिकांची संख्या अधिक असल्याने आता कोटा किती निश्चित होतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोटा निश्चितीनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या