Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ऑटोरिक्षांमध्ये आता जीपीएस अद्ययावत सॉफ्टवेअर

Share

नाशिक । प्रतिनिधी
गुन्हे नियंत्रणासाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्यातील ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम) लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्य शासन यासंदर्भात लवकरच आवश्यक कार्यवाही करणार आहे. राज्यातील लाखो रिक्षांना जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे.

शासनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी ‘वाहन 4.0’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हेे सॉफ्टवेअर सध्या मुंबई आरटीओ क्षेत्रातच वापरले जात आहे. त्याचा लवकरच राज्यभरात विस्तार केला जाणार आहे. सॉफ्टवेअर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करणे शक्य होणार आहे.

ऑटोरिक्षामध्ये जीपीएस लावण्यास सरकारने सुरुवातीला विरोध केला होता. हे शक्य नसल्याचे सरकारचे म्हणणे होते. दरम्यान, खासगी कंपन्यांच्या अ‍ॅपवरून ऑटोरिक्षा भाड्याने मिळतात. त्या ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस लावलेले असते. या खासगी कंपन्या ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस लावू शकतात तर, राज्य सरकारला यात अडचण येण्याचे काहीच कारण नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. न्यायालयाला यात तथ्य आढळून आल्याने ऑटोरिक्षामध्ये जीपीएस लावण्याची कार्यवाही करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला होता. त्यानुसार सरकारने आता कारवाई सुरू केली आहे.

रिक्षांच्या छताचा रंग बदलणार
सरकारने ग्रामीण व शहरातील ऑटोरिक्षांच्या छताचा रंग वेगवेगळा ठेवण्यासाठी नियमात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. छताचे रंग वेगवेगळे झाल्यास ग्रामीण ऑटोरिक्षांना शहरामध्ये अवैधपणे प्रवेश करता येणार नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!