Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वाहनधारकांना दिलासा ! फास्टटॅगसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली

Share

नाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (न्हाई) १ डिसेंबर २०१९ पासून सगळ्याच वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात येणार होते परंतु आता हि मुदत वाढविण्यात आली असून ती १५ डिसेंबर करण्यात आली आहे.

अन्य वाहनधारकांना फास्टटॅग उपलब्ध व्हावे यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी वाढविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (एनएचएआय) पाठविलेल्या पत्रात,  जुलैमध्ये महामार्ग मंत्रालयाने सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोलनाके ‘फास्टटॅग लेन’मध्ये रूपांतरित करण्यास सांगितले होते. त्यानंतर येत्या ०१ डिसेंबर पासून लागू करण्यास सांगण्यात आले होते. परंतु काल (दि. २९) रात्री यामध्ये बदल करीत ही मुदत १५ तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सध्या ‘फास्टटॅग’ राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ४५० टोल प्लाझावर उपलब्ध आहे. ‘फास्टटॅग उपलब्ध असणाऱ्या सर्व टोल प्लाझाची संपूर्ण यादी राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ( npci.org.in/netc.) या संकेतस्थळावर उपलब्ध असून वाहनधारकांना या संकेतस्थळाचा उपयोग फास्टटॅग’ मिळवण्यासाठी करता येणार आहे.

आरएफआयडी तंत्रज्ञान
‘फास्टटॅग मध्ये वाहन वर्ग आणि टॅगची स्थिती यासारख्या तपशीलांसह वाहनाचा वर्ग ओळखण्यात मदत करण्यासाठी रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरले जात आहे. तसेच शुल्क देण्यासाठी बँक अथवा आपल्या ई-वॉलेटशी कनेक्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहनाच्या विंडोस्क्रीनवर चिकटवलेल्या आरएफआयडी-आधारित ‘फास्टटॅग’मुळे आपल्या बँक खात्यातून  किंवा ऑनलाइन व्यवहार होणार आहे.

‘फास्टटॅग च्या व्यवहारासाठी काही लघु वित्त बँका, पेमेंट बँका आणि सहकारी बँकांसह २३ प्रमाणित बँकांद्वारे लिंक  करण्जायात आल्या आहेत. या सर्व बँकांची यादी एनपीसीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. निवडक टोल प्लाझा, पेट्रोल पंप, आरटीओ किंवा अमेझॉनवरुन ऑनलाइन ‘फास्टटॅग देखील मिळू शकतात. तसेच ‘मायफास्टॅग अ‍ॅप’ उपलब्ध असून या  अ‍ॅप देखील आपण व्यवहार करू शकणार आहात.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!