Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

गोपीचंद पडळकर यांचा भाजपात प्रवेश; बारामतीतून लढणार

Share

नाशिक : वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडीमध्ये महासचिव पदावर होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी या पदाचा राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकरांचे पुन्हा आपल्या घरात स्वागत आहे असे सांगत धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याकडे आमचा प्रयत्न राहील असे त म्हणाले. ते पुढे म्हणाले कि, गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ असून ते राजा आहेत. आणि या राजाला बारामतीतून उमेदवारी देणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!