Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘इ-व्हेइकल’मुळे ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरस’ना अच्छे दिन !

Share

नाशिक । भारतातील इलेक्ट्रिक वाहनांंना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे सध्या घडणार्‍या अनेक सकारात्मक गोष्टींतून दिसत आहे. सरकार आणि उद्योजकांनी ठरवलेली ध्येय धोरणे व योजना यातून ते साकार होऊ शकते, असे चित्र असून केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यायी इंधन तंत्रज्ञानाबाबत धोरण तयार करणार असून भारतात येत्या काळात ई-गतिशीलतेला जोर मिळण्याची शक्यता आहे.

तसेच पंतप्रधानांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये व आवश्यक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहनही उद्योगांना केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारतातील जवळपास 20% वाहतूक (कार, मोटार बाईक, स्कूटर, कार, ट्रक आणि ऑटो) विद्युतमध्ये समाविष्ट होईल. नवोदित ‘ईव्ही उद्योग’ बहुतांश ऑटोमोबाइल्स इंजिनिअरच्या नोकर्‍या विद्युत अभियंत्यांकडे वळवतील, शाश्वत विकासाची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रातील भविष्यातील पदवीधरांना रोजगार मिळण्याची शक्यता जास्त आहे.

टीमलीजच्या एका रिपोर्टनुसार सध्या सुमारे 1000 अभियंते इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहेत. भारतीय कंपन्या व भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) यासारख्या देशातील प्रमुख अभियांत्रिकी संस्था इलेक्ट्रिक व्हेइकल व प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. नाशिकमध्ये सुद्धा विविध अभियांत्रिकी महाविद्यालय आज इलेक्ट्रिक वाहनांवर प्रशिक्षण देत आहेत. महाविद्यालयांत इलेक्ट्रिक कारवर रिसर्च आणि डेव्हलपमेंटचे काम सुरू आहे.

हे तंत्रज्ञानाचे युग
सध्याची वस्तूस्थिती पाहता, 21 वे शतक हे आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्व काही इलेक्ट्रिक होत आहे व येत्या काही काळात सगळीकडे इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील. त्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनिअरला अच्छे दिन आले असं म्हणायला काही वावग नाही.
– प्रा. डॉ. दिपक कदम, (विद्युत विभाग प्रमुख, मेट भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक)

नवीन किंवा सुधारित इलेक्ट्रिक वाहने डिझाइन करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक कार अभियंत्यांची सध्या खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावरून समजते की येत्या काळात इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे भविष्य उज्ज्वल असू शकते.
-(हनुमंत चव्हाण, विद्यार्थी, इलेक्ट्रीकल इंजिनिअर)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!