Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जुने नाशिकमधील कोसळलेल्या वाडयांची खासदार गोडसेंकडून पाहणी

Share

 दे. कॅम्प ।वार्ताहर
सतत कोसळणारया मुसळधार पावसामुळे जुन्या  नाशिकमधील वाडयांची मोठया प्रमाणात पडझड झाली. आज खासदार हेमंत गोडसे यांनी जुन्या नाशिक परिसरात भेट देत या धोकेदायक वाडयांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरीकांच्या व्यथा जाणून घेत नुकसानग्रस्तांना अर्थिक मदत आणि वाढीव चटई क्षेत्र मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच जुने नाशिकमधील वाडयांच्या समस्यांबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्हयात पावसाने थैमान घातल्याने आतापर्यंत जुने नाशिक परिसरातील सुमारे 26 वाडे कोसळून नागरीक बेघर झाले तसेच संसारपयोगी साहीत्यांचेही नुकसान झाले. आज खासदार हेमंत गोडसे यांनी माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक संजय चव्हाण यांच्यासमवेत या भागाला भेट देत पाहणी केली. भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिरापासून या दौरयाला सुरूवात झाली. यावेळी दिल्ली दरवाजा परिसरातील भालेराव, दिक्षित, कुलकर्णी आणि जोशी यांच्या कोसळलेल्य वाडयांची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर सोमवार पेठेतील बापू गायधनी यांच्या वाडयाची पाहणी केली. यावेळी वाडयांचे मुळ मालक आणि तेथील रहीवाश्यांनी गोडसेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या.  वाडा कोसळल्याने आमचे सर्वच आम्ही गमावून बसलो आहे. आम्हाला भविष्याची चिंता भेडसावत असून शासनाकडून लकवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शासनाकडून आर्थिक मदत आणि मनपा प्रशासनाकडून प्रस्ताव गेल्यानंतर संपूर्ण जुन्या नाशिकच्या विकासासाठी वाढीव चटई क्षेत्र मिळवून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार गोडसे यांनी दिली. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, हरिभाउ लोणारी, नाना काळे, वामन तमखाने, संदिर आहेर, मनिष खेले, राजाभाउ कुलथे, हेमंत उन्हाळे,

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!