Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अरुणा नदी नैसर्गिकरीत्या पुनर्जिवित करा : देवांग जानी

Share

नाशिक । प्रतिनिधी
इंद्रकुंड ते रामकुंडापर्यंत अरुणा नदी पाईपलाईनद्वारे आणण्यास गोदा प्रेमी देवांग जानी यांनी विरोध केला आहे. इंद्रकुंड ते रामकुंडा पर्यंत अरुणा नदी नैसर्गिकरित्या पुनर्जीवित करावी. रामकुंडात गोदावरी व अरुणा या दोन्ही नदयाचा संगम व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी अधिकार्‍यांनी मंगळवारी (दि.25) गोदावरी नदी परिसराचा दौरा करुन पाहणी केली. यावेळी देवांगा जानी यांनी अधिकार्‍यांना नदीची माहिती दिली. यावेळी त्यांनी इंद्रकुड ते रामकुंडा पर्यंत अरुणा नदी पाईपलाईन द्वारे आणण्याच्या प्रयोजनास विरोध दर्शवला. यावेळी त्यांनी अरुणा नदीचे अस्तित्व दर्शवणारे सन 1917 चा डीएलआर मॅप आणि सन 1883 च्या ब्रिटिशकालीन मॅप सादर केला.

गोदावरी नदी पात्रात 9 ठिकाणी जिवंत जलस्रोत अस्तिवात असून कॉक्रीटीकरण फोडून त्यातून पाणी बाहेर येत आहे. त्याची माहिती आणि छायाचित्रे अधिकार्‍यांना सादर केली. नदी पात्रात बोरवेल अथवा कॉर घेऊ नये अन्यथा निरीच्या आदेशाचे उल्लंघन होईल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

17 प्राचीन कुंड कॉक्रीटीकरणमुक्त करून त्याचे पुनर्जीवित करावी, अशी मागणी त्यांनी केली. अरुणा-गोदावरी संगम नैसर्गिकरित्या पूर्वव्रत करावा आदी मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद स्मार्ट सिटी अधिकार्‍यांनी दिला. यावेळी स्मार्ट सिटीचे एस.पी. सिंग, विभांडीक, संजय पाटील, सुतार, ऋतुल जानी आदी उपस्थित होते.

17 कुंडाची माहिती सादर
गोपिकाबाई यांच्या तास, लक्ष्मण कुंड, धनुष्य कुंड, रामकुंड, पाण्याखालचे अरुणा नदीचे गौमुख, गौतम ऋषींची प्राचीन मूर्ती, अस्थीवलय कुंड, सीता कुंड, अहिल्यादेवी कुंड, सारंगपाणी कुंड, सूर्य कुंड (पाच देऊळ कुंड), दुतोंडया मारुती कुंड, अनामिक कुंड, दशाश्वमेघ कुंड, रामगया कुंड, पेशवे कुंड, खंडोबा कुंड, ओक कुंड, वैशंपायन कुंड, मुक्तेश्वर कुंड सदर 17 प्राचीन कुंडांची स्थान, नकाशे, प्रत्येक कुंडांची माहिती व सरकारी दप्तरी असलेली नोंद यांची माहिती जानी यांनी अधिकार्‍यांना दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!