Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : गोदावरी नदीवरील कटारिया पुलाला मोठं भगदाड

Share

नाशिक : गोदावरी नदीवरील गंगापूर रोड ते मखमलाबादला जोडणाऱ्या कटारिया पुलाला मोठं भगदाड पडले असून यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक बंद करण्यात आला आहे.

दरम्यान सुयोजित पुलाचा दत्त चौकाकडील भाग खचला असून पुलाच्या खालच्या बाजूस भगदाड पडलेले दिसत आहे. या ठिकाणी त्वरीत वाहतूक बंद केलेली आहे. परंतू मखमलाबाद कडून येणारी वाहने थांबवणे अवघड झाले आहे.

पुलाच्या जोडरस्त्याचा खालचा संपूर्ण भराव वाहून गेला असल्याने पाण्याचा प्रवाह दिसून येत आहे. रस्त्यावर काही भाग टिकून असून तो कधीही पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तात्काळ काही उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!