Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांच्या सहभागातुन होईल गोदावरी प्रदूषण मुक्त !

Share

नाशिक : गोदावरी प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून अद्यापही प्रदूषणात वाढ होताना दिसून येत आहे. हे नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. गोदावरीचे प्रदूषण दूर करण्यासाठी विविध संस्था व संघटनांकडून वारंवार प्रयत्न केले.

दरम्यान शहरात गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अनेक संस्था कार्यरत आहेत यापैकी एक म्हणजे गोदावरी गटारीकरण विरोधी मंच होय. गोदावरी नदी ही प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून गेली अनेक वर्षे कार्य करत आहेत. गोदावरी प्रदूषणासाठी केवळ प्रशासन जबाबदार नाही, तर एक नाशिककर म्हणून गोदावरी स्वच्छ करणे ही आपली जबाबदारी असल्याचे हि संस्था सांगते. राज्यभरात प्लास्टिक बॅन झाले असले तरी नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. त्यामुळे आजही सर्रास प्लॅस्टिक वापरले जात आहे. यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या संस्थेच्या माध्यमातून शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करतात. यातून काहीअंशी मुलांमध्ये फरक दिसून येत असल्याने या उपक्रमाचा अधिक प्रसार या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. लहान मुले सांगितलेली गोष्ट लवकर आत्मसात करतात. त्यामुळे लागलीच त्या गोष्टीचा आपल्या जीवनात उपयोग करीत असतात. लागलीच मुलांकडून पालकांपर्यंत प्लास्टिक बंदीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.

गोदावरीत सोडले जाणारे निर्माल्यही गोदावरी प्रदूषित होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. काही लोक निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ते नदीत सोडतात. यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होत असल्याने परिणामी नदी प्रदूषण होते.

गणेश विसर्जन दरम्यान संस्थेच्या माध्यमातून गोदावरी तटावर स्थळ उभारले जातात. यातून गणेश मूर्ती संकलित केल्या जातात. गेल्यावर्षी त्यांच्याकडे दोन लाख ४५ हजार एवढ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जमा झाल्या होत्या. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती सिमेंट कॉंक्रिटचा पार अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि कालांतराने अशी झाडे कोलमडून पडतात. यासाठी संस्था काँक्रीट पार काढून त्याठिकाणी झाडाला सुरक्षित करण्याचे काम संस्था करते.

संस्थेच्या या कार्यामुळे संस्थेला नाशिक भूषण, नाशिक रत्न, ज्ञानदीप, अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जलनायक, जलयुद्ध कशात पदव्याही त्यांना लोकांना बहाल केले आहे.

(संकलन : चैत्राली अढांगळे)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!