Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

गिरणारे : प्रवाशांचा असुरक्षित प्रवास; एका गिअरवर धावली गंगापूर ते माळेगाव बस

Share

नाशिक : गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी या घोषणेसोबत प्रवास करणारी एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. काही गावात रस्ता चांगला नसतानाही केवळ प्रवाशांची गैरसोय नको म्हणून तेथे सेवा दिली जात आहे. परंतु वाघेरा-हरसूल, ठाणापाडा, रोहिले-माळेगाव या ठिकाणी जाणाऱ्या बसेस तपासणी न करता तसेच आवश्यक दुरुस्ती केली जात नसल्यामुळे बंद पडण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने या भागासाठीही खराब झालेल्या तसेच वय संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत. महामंडळाचा या भोंगळ कारभारामुळे दैनंदिन प्रवास करणारे प्रवाशी हतबल झाले आहेत. आठवड्यातून दोनतीन वेळा बस बंद पडल्याचा प्रकार होत असल्याने बसमधील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

गिरणारे पुढे २०-२५ अंतरावर असणाऱ्या रोहिले -हिरडी, पिंप्री-माळेगाव या ठिकाणी नाशिक येथून सुटणारी रोहिले-माळेगाव हि बस असते. वेळापत्रकानुसार सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही गाडी आगारातुन निघते. या बसमध्ये दैनंदिन प्रवाशांसह इतरही प्रवाशी जात असतात. दरम्यान शनिवारी नेहमीप्रमाणे प्रवाशी आगारात गाडीची वाट पाहत असताना पावणे सातच्या सुमारास गाडी येत असते. परिणामी साडे आठ वाजेपर्यंत प्रवाशी ताटकळत उभे होते. त्यावेळी प्रवाशांनी एकत्र येत आगार व्यवस्थापकाला जाब विचारला. परंतु बस बंद पडली असून आज येण्याची शक्यता कमी असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

दुसऱ्या दिवशी बसच्या वेळेनुसार बस आगारातून निघाली. नेहमीची बस नसल्याने बस बंद पडण्याची शाश्वती नव्हती. परंतु गंगापूर परिसरात पुन्हा गियर खराब झाल्यामुळे बस बंद पडली. गाडीतील वाहनचालकांनी बस डेपोत संपर्क केला असता ‘सध्या कोणी येणार नाही आपणच काहीतरी करूनच गाडी दुरुस्त करावी अशी सुचना आली’. परिणामी वाहनचालकांनी एका गिअरवर गाडी पुढे नेली. यांनतर प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडला.

बसच्या तपासणीकडे दुर्लक्ष
एकूणच बसच्या तपासणीकडे आगाराचे दुर्लक्ष होत असल्याने या घटना घडत आहेत. रात्री उशिरा आलेल्या बसची तपासणी, आवश्यक दुरुस्ती न करता या बस सोडल्या जातात. त्यामुळे बिघाड होण्याचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार अनेक चालक करीत आहेत. ग्रामीण भागात घाट, रस्ते खराब या समस्या येत असतात. त्यामुळे वेळीच बसची देखभाल होणे आवश्यक आहे.

वाहनचालकांनी बस बंद पडल्यानंतर स्थानिक डेपोतून प्रतिसाद न दिल्यास आगरव्यवस्थापकाकडे तक्रार करावी. तसेच गाडी काढण्यापूर्वी वेळीच देखभाल करून मगच आगारातून गाडी काढावी. वाहनचालकांच्या बसबाबत असणाऱ्या समस्या सोडवण्यासंदर्भात प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.                                                                                                                           -नितीन मैंद, विभाग नियंत्रक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!