Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : घोटी सिन्नर हायवेवर केमिकल पसरले; नाल्यातील पाणी, पिकांचे नुकसान

Share

नाशिक : घोटी सिन्नर हायवे लागत धामणगाव परिसरात अज्ञात वाहनाने केमिकल टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान अधिक माहिती अशी कि या महामार्गावर धामणगाव नजीक अज्ञात केमिकल घेऊन चाललेल्या एका वाहनाने येथील नाल्यात केमिकल टाकले. यामुळे नाल्यातील पूर्ण पाणी दूषित झाले असून हे पाणी पुढे दोन ते तीन किमीवर असलेल्या दारणा धरणात जात असल्याने धरणातील पाणी दूषित होण्याची शक्यता आहे.

तसेच येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातही हे केमिकल पडल्याने पिके जळून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान देखील झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिसरात अनेक पिण्याच्या पाण्याच्या विहरी असून या केमिकल मुळे पिण्याचे पाणी दूषित झाले तर येथील चार पाच गावांना याचा फटका बसू शकतो असेही येथील गावकऱ्यांनी सांगितले

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!