आ. निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली घोटीत विरोधकांचा पायी मोर्चा

0

घोटी प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर आ निर्मला गावित यांच्या नेतृत्वखाली विरोधकांनी घोटी शहरातून हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. बंद दुचाकी हातगाडीवर ठेऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. तब्बल तासभर काढलेल्या मोर्चाचा महामार्गावर ठिय्या आंदोलन करून समारोप करण्यात आला.

घोटी शहरात आज काँग्रेसचे आ निर्मला गावित, माजी जि प सदस्य जनार्धन माळी, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मुळचंद भगत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश खातळे, व माकपाचे जिल्हा नेते देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा विरोधकांनी बाजारपेठेतून केंद्र सरकारचा निषेध मोर्चा काढला. इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी, फडवणीस सरकार हाय हाय, चले जावं चले जाव – मोदी सरकार चले जाव, अच्छे दिन कब आयेगे, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करण्यात आला.

आमदार निर्मला गावित यांच्या संपर्क कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.जैन स्थानक, गणपती मंदीर, बाजार समिती, मार्गे महामार्गावरील किनारा हॉटेलजवळ समारोप करण्यात आली. महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*