Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

घोटी : जिंदल कंपनीजवळ अनोळखी युवकाचा मृतदेह

Share

घोटी प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल कंपनीलगत शाळेजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्याची ओळख मात्र पटलेली नाही.

याबाबत घोटी पोलिसांनी दिलेली माहिति अशी की जिंदाल कंपनीलगत न्यू इंग्लिश स्कूलजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी एका ३० ते ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. मात्र अद्यापही या मृत युवकाची ओळख पटलेली नाही त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.

या मृत युवकाची उंची ५ फुट असून डावे हातावर आंजुबाई असे तर दंडावर हनुमानचे चिन्ह, छातीवर बदामाचे चिन्ह त्यात इंग्रजी T असे गोंदलेले आहे. अशा वर्णनाच्या या मृत इसमाबाबत ओळख असल्यास अगर काही माहिती असल्यास घोटी पोलिस ठाणे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन घोटी पोलिसांनी केले आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!