Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यात चोवीस तासात ११८ मिमी पावसाची नोंद

Share

घोटी : गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने इगतपुरी तालुक्यात काल सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरु असलेल्या संततधार पाउसामुळे ग्रामीण भागात काहीसे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात ११८ मिमी पाउसाची विक्रमी नोंद झाली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना काल पासून पडलेल्या दमदार पावसाने भात रोपांना नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

इगतपुरी तालुक्यातील जून अखेरीस पाउस सुरु झाला आसला तरी काल मात्र पावसाने चांगलीच मुसंडी मारली. गेल्या चोवीस तासात घाटमाथ्यावरील इगतपुरी, घोटी, भावली, मानवेढे, काळूस्ते, वैतरणा भागात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेतात पाणी साचले आहे आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात विक्रमी ११८ मिमी पाउसाची नोंद झाली आहे. तर आजपर्यंत २७६ मिमी पाउस झाला आहे.

तब्बल दहा ते बारा तासापासुन सुरु असलेल्या या पावसाने सर्वच घटकांना दिलासा मिळाला शेतकरी, सामान्य नागरिक तसेच टंचाइग्रस्त गावांना हा पाऊस दिलासादायक आहे. काहीसे दुबार पेरणीचे संकट टळले. तालुकयात जवळपास वीस गावे वाड्या पाड्याना टँकरने पाणीपूरवठा सुरु होता. या दमदार पावसाने या टँकरग्रस्त गावांची पाणीटंचाई काहीशी दूर होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

एका बाजूला दहा ते बारा तास झालेल्या दमदार पावसाने घोटीकर सुखावले असले तरी दुसऱ्या बाजूला पाऊस सुरु होतास तब्बल बारा ते पंधरा तास अर्धे घोटी शहर अंधारात होते. घोटी- अंबुजी वाडी परिसरात ११ केव्हीची केबल जळून गेल्याने अर्धे घोटी शहराचा विजपुरवठा तब्बल १५ तास खंडित होता त्यामुळे सर्वच नागरिक परेशान झाले होते

अंबुजी वाडी, संताजी नगर रामरावनगर परिसर आदि ठिकाणी नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. घोटीतही वीजपुरवठा बंद राहिल्याने जनजीवनच ठप्प झाले होता. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळकरी विद्यार्थची ऑनलाइनची कामे, झेरॉक्स, आदि कामे मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागला.

तसेच या पावसामुळे ग्रामीण भागातही अनेक गावांत खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न भेडसावत होता. ग्रामीण भागातही वीजपुरवठा सुरळीत राहील याकडे विज वितरण कंपनीने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!