Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

घोटी : ट्रक चालकावर चाकूहल्ला करणाऱ्या दोघांना अटक तर दोघे पसार

Share

घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर तळेगाव शिवारात चालकावर चाकू हल्ला करीत लुटमार करणाऱ्या दोघांना घोटी टॅबच्या वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अखेर जेरबंद केले आहे. तर परप्रांतीय जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे आपल्या काही कर्माचा-यांसोबत मध्यरात्री १.३० दरम्यान महामार्गावर पेट्रोलिंगवर गस्त घालत असतांना नियंत्रण कक्षाकडून वायरलेस वरून अपना हॉटेल समोर दरोड्याची व खुनी हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आपले वाहन दरोड्याच्या घटनास्थळावर नेले असता दोन बिहारी परप्रांतीयांवर चाकूचे वार झाले होते.

अनिलकुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर चंदनकुमार यादव हा गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यांना तातडीने पोलीस वाहनांतून रुग्णालयात दाखल केले. कंटेनर लुटमार करतांना यांच्यावर हा प्राणघातक हल्ला चार दरोडेखोरांनी केल्याची माहिती त्यांनी दिली. कंटेनर मधील दस्तावेज व टायर खोलून पसार झाले होते.

अशातच महामार्गावरून काही तरुण पळतांना पोलिसांना दिसले त्यांचा पाठलाग करत असताना पोलिसांवर त्यांनी लाकडी दांडे व दगड फेक सुरु केली. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता दोघांना हत्यारासह पकडले. संशयित आरोपी संतोष सुरेश जाधव, किरण सोमनाथ येले दोघेही (रा. हेल्याची मेट ता. त्र्यंबकेश्वर) यांना पकडण्यात आले तर दरोड्यातील अन्य दोन साथीदार गोटीराम दामू आचारी, दीपक जाधव दोघेही (रा. तळेगाव ता. इगतपुरी) हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

सदर वरील आरोपींना अनेकदा महामार्गावर दरोडे टाकतांना विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे असंख्य गुन्ह्यांची उकल होणार आहे.

घटनेची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह व महामार्ग पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांना समजताच घोटी टॅबच्या पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संतोष गांगुर्डे, महेंद्र बागल, राजेंद्र जाधव, सुर्यकांत पाटील, अर्जुन निंबेकर, संदीप शिंदे, विलास कावळे, संतोष माळोदे यांनी ही कामगिरी बजावली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!