घोटी शहरासह तालुक्यात गणेशमुर्ती विक्रीसाठी दाखल

0

घोटी : इगतपुरी तालुक्यासह घोटी परिसरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून गणेशमूर्ती घोटी शहरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या असून गणेश मंडळांचा बैठका सुरू झाल्या आहेत. मुर्तीकार गणेशमूर्तीवर सजावटीसाठी शेवटच्या हात फिरवत असतांना दिसून येत आहे.

गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या सजावटीच्या साहित्याचे दर वाढले असुन दरवर्षीपेक्षा गणेशमूर्तीचा किंमतीत यंदा 10 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान घोटी शहरात इतर जिल्ह्यातून मुर्ती विक्रीसाठी येऊ येत आहे. गणेशमूर्तीसाठी जीएसटी कर नसला तरी सजावटीच्या साहित्यावर मात्र जीएसटी असल्याने गणेशमूर्तीसाठी काहीशी दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले

दरम्यान गणेशभक्तांनी शाडु मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे अशी देखील चर्चा सर्वत्र सुरू आहे. तसेच जीएसटी लागु झाल्याने सर्व कच्चा मालाच्या किमती 18 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे किंमती महाग राहणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान शहरात गणेश मंडळांची लगबग सुरू झाली असून गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. तालुक्यात पेण, पनवेल, नगर, नाशिक आदी ठिकाणावरून तयार करण्यात आलेल्या मुर्त्या विक्रीसाठी आल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यातून गणेश मूर्ती घेण्यासाठी ग्रामीण भागासह नागरिक मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. लहान मूर्तीपासून ते महाकाय मोठ्या मुर्त्याही विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गणेश मूर्तीची दुकाने, सजावटीच्या साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. इलेक्ट्रिक साहित्यही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत.

LEAVE A REPLY

*