बेलगाव कुऱ्हे : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

0

बेलगाव कुऱ्हे : वार्ताहर

मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला फाट्याजवळील प्रभुचा ढाब्याजवळ शुक्रवारी रात्री ०९. १५ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत अकोले तालुक्यातील खिरविरे येथील एक ठार झाल्याची घटना घडली. पायी चालणारे पत्नी मुलगा बचावला असून अज्ञात वाहन यावेळी पसार झाले.

अधिक माहिती अशी की, विरुद्ध बाजूला असलेल्या हॉटेल प्रभू ढाब्यावर भोजन करण्यासाठी पत्नी व मुलाला सोबत घेउन रोड क्रास करित असताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अकोले तालुक्यातील खिरविरे येथील संतोष दत्ताराम डगळे वय (४५) गंभीर जखमी झाले. त्यांना जगतगुरु नरेंद्रचार्य संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात त्यांच्या बरोबर पायी चालणाऱ्या पत्नी नम्रता संतोष डगळे वय (३०), मुलगा चिराग संतोष डगळे वय (०३वर्षे) हे अपघातात बचावले.

LEAVE A REPLY

*