कामयानी एक्सप्रेस मध्ये बॉम्ब असल्याची अफवा; इगतपुरीत तीन तास तपासणी

0

जाकिर शेख । घोटी : मुंबइहुन वाराणसीकडे जाणाऱ्या कामयानी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती रेल्वे व लोहमार्ग पोलिस प्रशासनाला मिळाल्याने खळबळ उडाली. या दोन्ही यंत्रनांनी इगतपुरी रेल्वे स्थानकावर रेल्वे जवळपास तीन थांबउन संपूर्ण रेल्वेची झाडाझडती घेतली. डॉगस्कॉड व बॉम्ब शोध पथकानेही तात्काळ धाव घेऊन रेल्वेची व प्रवाशीसोबत असलेल्या सामानांची तपासणी केली.

आज दुपारी मुंबइहुन वाराणसीकडे जाणाऱ्या एलटीटी, वाराणसी ११०७१ ही कामयानी एक्सप्रेस मध्ये बॉम्ब असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. रेल्वे पोलिसांनी तात्काळ इगतपुरी लोहमार्ग पोलिसांना सूचित करून तात्काळ रेल्वे थांबुन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दुपारी 3 वाजेच्या सुमारास कामयानी एक्सप्रेस इगतपुरी स्थानकावर येताच रेल्वे प्रशासन व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेचा ताबा घेयून तपासणी सुरु केली. दुसरीकडे नाशिकहून डॉग स्कॉड व बॉम्ब शोध पथकाला बोलावल्यात आले होते. या दोन्ही यंत्रनांनी तब्बल तीन तास या रेल्वेची कसून तपासणी केली. रेल्वेतील सर्व प्रवाशांना खाली उतरून रेल्वे बोगिची व प्रवाशांच्या साहित्याची तपासणी केली मात्र कोणतीही संशयास्पद वस्तु आढळून आली नाही.

या मोहिमेत लोहमार्ग पोलिस फोर्सचे (आरपीएफ) निरीक्षक एस एस बर्वे व त्यांचे पथक, रेल्वेचे सहाय्यक निरीक्षक संजोग बच्छाव, एम गायकवाड़, शहरा पोलिस निरीक्षक रत्नपारखी यांच्यासह एटीएसच्या पथकानेही रेल्वेची कसून तपासणी केली. यावेळी ट्रेन इन्चार्ज एस बी जैन, एस एन सरकार स्टेशन टीमचे शशी पाटील, टीएक्सआरचे ए एम घुले, लोकोपायलट एम सी शाह, गार्ड पांडेय, बॉम्ब शोध पथकाचे अधिकारी शिंदे, “स्पाइक” श्वान पथक व वाहतूक पोलिसांनी आदिसह रेल्वे पोलिस, रेल्वे कर्मचारी व वाहतूक पोलिस आदिनी या तपासणी मोहिमेत सहभाग नोंदवला.
——————–
नाशिकच्या बॉम्बशोधक व नाशक पथक यांनी आज दुपारी १६.१५ ते १८ वाजेच्या या दरम्यान कामयानी एक्सप्रेस तसेच इगतपुरी रेल्वे स्टेशन प्लाटफार्म क्र १ वर बोगी क्र ५३, ५४, ५५ घातपाताबाबतची तपासणी केली. पथकाचे पोलिस निरीक्षक शिंदे व पथकाने रेल्वे पोलिस, लोहमार्ग पोलिस, आदी यंत्रणांच्या सहकार्याने ही तपासणी केली. सुरक्षेसाठीच्या सर्व उपाययोजना केल्या. या तपासणी दरम्यान कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तु अथवा संशयित वस्तु आढळून आली नाही. ही खात्री पटल्यानंतरच ही कामयानी एक्सप्रेस सायंकाळी १८.२५ वा च्या दरम्यान पुढे रवाना करण्यात आली.

LEAVE A REPLY

*