Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषातून महिलेवर अत्याचार

Share

नाशिक । प्रतिनिधी
पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत भोंदु बाबाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना धु्रवनगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलीसांनी महिलेसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विनोद बाबा, राजेंद्र गायकवाड, पाटील, नाना, केशर बाई (पुर्ण नाव, गाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पिडीतीने दिलेल्या तक्रारीनुसार जुन २०१८ ते आतापर्यत या सर्वांनी महिलेस पैशांचा पाऊस पाडून देण्याचे अमिष दाखवून विविध ठिकाणी नेवून अत्याचार केला. तर भोंदू बाबाशी लग्न झाल्याचे भासवून वेळोवेळी अत्याचार केला.

तसेच मारहाण करून काही दिवसांपुर्वी तीचा गर्भपात केला. या तक्रारीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांवर बलात्कारासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!