Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video: जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच

Share

नाशिक । प्रतिनिधी
तीन दिवसांपासून कोसळणार्‍या दमदार पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 80 टक्क्यांपर्यंत भरले आहे. तर दारणा धरण 87 टक्के भरले आहे. खबदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि.29) नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून 60 हजार, दारणातून 16 हजार 688 तर, गंगापूर धरणातून सहा हजार 510 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदेला पुर आला होता. दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागले होते. दरम्यान,पाणी सोडल्याने गोदा काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला. जीवित व वित्त्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर सर्तक होते.
शहर व जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

अहिल्यादेवी होळकर पुलावरुन

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, २९ जुलै, २०१९

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्र्यंबकमध्ये मागील तीन दिवसांत चारशे मिलीमीटर इतका पाऊस कोसळला. नाशिक शहराची तहान भागवणार्‍या गंगापूर धरणाचा जलसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग केला जात आहे. सोमवारी धरणातून दुपारी दोन वाजता एक हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले.

त्र्यंबकला होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. परिणामी सायंंकाळ धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. 6 हजार 510 क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गोदेला पूर आला होता. जिल्हा प्रशासनाकडून गोदा काठचे रहिवाशी, दुकानदार यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागले होते.

गोदाकाठची मंदिरात पाणी शिरले. यंदाच्या हंगामात गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग कमी करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!