Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | नाशिक : बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी; शाडूमातीच्या कार्यशाळांना प्रतिसाद

Share

नाशिक : सगळीकडे गणेशाच्या आगमनाचे वेध लागले असून शहरात जय्यत तयारी सुरु झाली आहे. दरम्यान इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कुल येथे शाडूमातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच शहरातही विविध संस्था, शाळा यांच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

दरम्यान बाप्पाच्या आगमनासाठी अवघ्या शहरात गेल्या आठ दिवसांपासूनच जय्यत तयारी सुरू असून येत्या २ सप्टेंबर रोजी बाप्पा विराजमान होणार आहेत. या पार्श्वभूमीवरच ठिकठिकाणी गणेशोत्सवानिमित्त स्वतः गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा घेण्यात येत आहे.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. बनविलेल्या मूर्ती वाळवून मूर्तीचे रंग देण्याचे कामही सुरु आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती बनविण्यासाठी लाकडी पाट, पाण्याचे भांडे, कापड, लहान पट्टी व मोठी स्टीलची वाटी, टूथपिकची काडी, पेन, पेन्सिल, स्केचपेन या वस्तुंचा वापर करून गणेशमूर्ती साकारत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!