Type to search

Breaking News गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

गणेशोत्सव २०१९ : विसर्जन मिरवणुक मार्गाची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहरातील पारंपारीक गणेशोत्सव मिरवणुक मार्गाची आज पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील तसेच मनपाच्या पदाधिकार्‍यांनी पाहणी केली. दरम्यान मिरवणुक शांततेत पार पडावी, गर्दीचे नियंत्रण व सुरक्षा या अनुषंगाने आयुक्तांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचना केल्या.

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून अवघ्या दोन दिवसांनी लाडक्या बप्पांना निरोप देण्यात येणार आहे. नाशिक शहरासह परिसरातून मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघतात. शहरातील पारंपारीक गणेश विसर्जन मिरवणुकीत 22 ते 25 गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात. तर सर्व मंडळांचे भव्य देखावे, जीवंत देखावे तसेच पारंपारीक वाद्यांची मोठी जंत्री असते. ही मिरवणुक पाहण्यासाठी नाशिककरांची मिरवणुक मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी असते.

या धामधुमीत कोणत्याही कारणावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवूनये, मिरवणुक पाहण्यासाठी होणार्‍या गर्दीचे नियंत्रण, मिरवणुक मार्गावरील अडचणी, अडथळे, सुरक्षा, बंदोबस्त या अनुषगांने पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी आज या मार्गाची पाहणी केली.

वाकडी बारव या ठिकाणावरून त्यांनी पाहणी दौर्‍यास सुरूवात केली. दुधबाजार, चौक मंडई, गाडगेमहाराज चौक, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, महात्मागांधीरेाड, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविया चौक, शनिचौक, मालविय चौक, सांडवा देवी, गोदाघाट या संपुर्ण मार्गाची पाहणी त्यांनी केली.

पाहणी दौर्‍यादरम्यान आ. बाळासाहेब सानप, भापचे सुनील बागुल, गटनेते सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांची भेट घेऊन सुचना केल्या. दौर्‍यात पोलीस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, सहायक आयुक्त अशोक नखाते, अनिरूद्ध आढाव, प्रदिप जाधव, मंगलसिंग सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे, हेमंत सोमवंशी, के.डी. पाटील, अशोक भगत, फुलदास भोये यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

उत्साहात मिरवणुका पार पडण्यासाठी सर्वांचे प्रयत्न
पोलीसख राजकीय प्रतिनिधी, गणेशमंडळ प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह संयुक्त पणे मिरवणुक मार्गाचा पाहणी दौरा आज झाला. रस्त्यावरील खड्डे, विद्युत तारा, पडके वाडे, मिरवणुक मार्गावरील धार्मिक स्थळे, मिरवणुक मार्गाला जोडणारे सस्ते, वाहतुक याचा सविस्तर आढावा आज घेतला आहे. संपुर्ण गणेशोत्सवात मंडळांशी चांगला संवाद आहे. येथील वातावरण अतिश सहकार्यपुर्ण असल्याने येणारी गणेश विसर्जन मिरवणुक अतिशय उत्सहात पार पडेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.
– विश्‍वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त

अशा सुचना
* मिरवणुक मार्गावरील दुकाने बंद ठेवावीत
* दुचाकीसह सर्व वाहनांना प्रवेश बंदी
* धोकादायक तारा हटवणे
* खड्डे भरून घेणे
* स्मार्टरोडवरील स्पीड ब्रेकर सपाट करणे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!