Type to search

Breaking News गणेशोत्सव मुख्य बातम्या

गणेशोत्सव २०१९ : गणपती बाप्पा मोरया’ इन ‘अमेरिका’

Share
 देवळाली कॅम्प :   देशात सर्वजाती धर्मचे नागरिक ज्या भक्ती भावाने गणरायाची स्थापना करतात त्याच धर्तीवर परदेशात ही मोठया उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो.
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील हिंदू सोसायटी च्या माध्यमातू ऑरलेन्डो मराठा मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विवध भागातून नौकरी व वेवसाय निमत्त आलेल्या लोकांनी हिंदू सण व उत्सव साजरा करणयाची सुरू केलेली परंपरा आजही सुरूच आहे. त्यात कालानुरूप होणारे बदल स्वीकारत युवा पिढी देखील हा भारतीय संस्कृती चा ठेवा जपत आहे.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे उत्सव मोठया धूम धडाक्यात साजरा करतांना वेशभूषा देखील अस्सल मराठमोळी असते.सुरू असलेला गणेशोत्सव सर्वांच्या सहभागातून साजरा होत आहे. आकर्षक गणेश मूर्ती ,देखावा मिरवणुकीमध्ये ढोल ताशा व लेजीम या पारंपरिक वाद्याचा वापर  करत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले जाते.
नोकरी व्यवसायातून वेळ काढून ही सर्व मंडळी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. सध्या नाशिक स्थित प्रविण माळोदे- आडगाव,  योगेश वाघचौरे -शेवगे दारणा, सागर जाधव-नाशिक या कुटुंबियांसोबत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, सातारा येथील महाराष्ट्रीयन कुटुंब सहभागी झाले आहे.
दररोज गणपती आरती, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम याने उत्सवाची रंगत वाढली आहे. या सण उत्सवाच्या वेळी तेथील पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त दिला जातो. महाराष्ट्रच्या गणेशोत्सव चे आकर्षन इतर धर्मियांना भुरळ पाडीत असून मिरवणुकीत सहभागी होत असल्याने. खऱ्या अर्थाने आदी पूज्य व विध्येचे दैवत असलेले गणराय जगप्रसिद्ध होत आहे.
गणपती उत्सव दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून प्रदेशात ही अनेक  विविध जातीचे लोक या उत्सवामध्ये सहभागी होऊन बाप्पाच्या प्रति आपली श्रद्धा व्यक्त करीत आहे. आम्ही महाराष्ट्रियन मंडळी एकमेकांच्या संपर्कात राहून आपले सण उत्सव साजरे करतो.
-प्रविण माळोदे ,ऑरलेन्डो
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!