Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery: ‘फीडीग इंडिया नाशिक’च्या माध्यमातून भुकेल्यानां मायेचा ‘घास’

Share

नाशिक : दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात नाशिकमध्ये साजरा केला जातो. गणपतीचीचा निरोप देखील हा या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. फिडींग इंडियाच्या वतीने विसर्जनदरम्यान देण्यात येणारा प्रसाद संग्रहित करून भुकेल्यानां वाटण्यात आला. तसेच नाशिकमहानगर पालिकाच्या वतीने ‘गो ग्रीन’ हा उपक्रमही राबविण्यात आला.

दरम्यान संभाजी स्टेडियममध्ये मनपाबरोबर भागीदारी करत सर्व गणेश भक्तांच्या सोयीकरिता विसर्जनासाठी टाक्या व निर्माल्य साठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आले होते. हा उपक्रम नाशिक फिडींग इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात आला.

फीडीग इंडिया नाशिकने त्याच ठिकाणी प्रसाद व इतर खाद्यपदार्थाचे संग्रह करण्यासाठी स्टॉल लावला होता. फीडीग इंडियाचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, निशा देशमुख, मंगल दंगल, अंजली कुलकर्णी, अजय कणव आणि त्याचे शहराध्यक्ष पूनम कणव यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत उपस्थित राहून मोदक, नारळ, खिरापत, पोळी भात एवं पोहेचे मिश्रण यांचे सहा कंटेनर एकत्रित केले.

संग्रहित करण्यात आलेले अन्न तथा प्रसाद कुमटेवाडी येथील झोपडपट्टी, मुंबई महामार्गावर जवळ आणि ‘शरण’ जनावरांच्या निवाराला देण्यात आले. तसेच भुकेल्या व गरजू लोकांना तसेच जनावरांना पुरवण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!