पंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या

0
प्रतीकात्मक फोटो

नाशिक । सर्व शहर तसेच जिल्हाभरात गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडल्या असताना पंचवटी परिसरातील मिरवणुकीत हाणामार्‍या झाल्याने मिरवणुकीस गालबोट लागले. तर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले.

तपोवन मित्र मंडळाची मिरवणुक सुरू असताना डीजेच्या तालावर या मिरवणुकीत नाचणारे आमदार पुत्र नगरसेवक मछिंद्र सानप यांच्या काही मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने नाशिकमधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. मात्र पोलीस व आमदार सानप यांनी असा प्रकार घडला असल्या बाबत इन्कार केला आहे.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात 7 ते 8 जणांवर हाणामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार तपोवन ते कपिला संगम या मार्गावर रविवारी रात्री साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी माणिक पवार या पोलीस कर्मचार्‍याने तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

*