मैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार

0

नाशिक : गणपती विसर्जनाचे औचित्य साधत मैत्रीबंध फाउंडेशनच्या माध्यमातून मूर्ती संकलन तसेच निर्माल्य संकलित करीत स्वच्छतेचा संदेश नागरीकांना दिला. यावेळी स्वछतेचे महत्त्व पटवुन देत आपला भोवतालचा परीसर स्वछ ठेवण्याचे आवाहन मैत्रीबंध फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.

गणेशमूर्ती व सोबतचे निर्माल्य, कचरा नंदिनी नदीपात्रात टाकण्यापासून नागरिकांना परावृत करून तब्बल 6.5 टन निर्माल्य संकलन करण्यात आले. तसेच गणेश मूर्ती विसर्जित न करत संकलनातून ८२१७ मूर्ती संकलित करण्यात आल्या.

मैत्रीबंध फाउंडेशनच्या सदस्यानी दिवसभर विसर्जन स्थळी गणेश मूर्ति जमा करून घेणे, निर्माल्य व इतर कचरा जमा करून परिसर स्वछ ठेवणे व नंदिनी नदीचे पाणी प्रदूषण टाळण्यासाठी मदत केली. तसेच संकलित करण्यात आलेल्या मूर्ती नाशिक महानगर पालिकेकडे जमा करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*