Photo Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप

0

नाशिक : लाडका बाप्पा दहा दिवस गावाकडच्या मातीत रमल्यानंतर आज त्याच लाडक्या गणरायाला ग्रामीण भागात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी साद घालत बापपला निरोप दिला. ठिकठिकाणी बाप्पाना विसर्जित न करत मूर्तींचे संकल करण्यात येत होते.

यंदा डीजे मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक बघायला मिळाली असून पारंपरिक वाद्यांवर भर दिलेला असल्याचे परिसरात दिसून आले. गणेशभक्त लाडक्या बाप्पाला निरोप देताना विघ्नहर्त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याची आर्जव करत बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे.

कुठे बैलगाडीत, तर कुठे डोक्यावर अशा पद्धतीने बाप्पाला गावाकडं निरोप देताना पाहायला मिळाले.
हरसूळ जवळील वाघेरा येथे युवकांनी बैलगाडीत गणेश विसर्जन मिरवणूक काढली. यात महिला वर्गासह बाळगोपाळांनी ‘ढोल ताशा च्या तालावर नाचत आनंद द्विगुणित केला.

पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदीवर परिसरातील गणेश भक्तानी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता देशमाने तसेच त्यांच्या सहकार्यांनी गणेश मूर्तीचे संकलन केले.

हतगड सुरगाणा येथील गावात युवकासह बालगोपाळ व महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली .

LEAVE A REPLY

*