Video : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतील नाशिकचा गणेशोत्सव

0

नाशिक : गणरायाच्या आगमनाआधी आणि गणरायाच्या आगमनानंतर देखील इको फ्रेंडली गणेश ही संकल्पना राबवित नाशिककर गणेशोत्सव साजरा करीत आहेत. त्यात यंदा नाशिकचे आयर्नमॅन असलेले पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पर्यावरण पूरक गणेशा तसेच ‘गणेशोत्सव नाशिकचा २०१८’ यावर आधारित स्वगताच्या माध्यमातून नाशिककरांना आवाहन केले आहे.

या स्वगताची संकल्पना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची आहे. दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे असून लेखन सदानंद जोशी यांनी केले आहे. तर सदर स्वगता मिलिंद गांधी यांनी लिहले असून संगीत धनंजय धुमाळ यांनी दिले आहे तर आनंद अत्रेंनी हे स्वगत म्हटले आहे.

या स्वगतामध्ये  ध्वनी प्रदूषण, पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर, रहदारीचे नियम पाळण्याबाबत, महिलांना सन्मान, व्यसनमुक्त गणेशोत्सव, प्लास्टिक बंदी, सायबर गुन्हे आयडी विषयांना अनुसरून सदर स्वगत संपादन केले आहे.

नाशिकरानी या मोहिमेत सहभागी होऊन नाशिकचा गणेशोत्सव एक आदर्श गणेशोत्सव म्हणून साजरा करूया तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू त्याकरता प्रत्येकजण प्रयत्नशील राहू आणि नाशिक पोलिसांना सहकार्य करू अशा आशयाचे चित्रण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*