Type to search

गणेशोत्सव नाशिक

पालवी फाउंडेशन तर्फे पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव स्पर्धा

Share

नाशिक : जलसिंचन आणि सामाजिक उपक्रमात योगदान देणाऱ्या नाशिकमधील पालवी फाउंडेशन तर्फे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोपासव स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यासाठी शाळा महाविद्यालयांमार्फत त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाईल. दोन गट असणार आहेत. स्पर्धेत अधिक विद्यार्थी सहभागी होणाऱ्या एका शाळेला आणि एका महाविद्यालयाला विशेष बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी फाउंडेशन गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये जनजागृती मोहीम राबविते. पाहिल्यावर्षी अनंत चतुर्दशीला जलप्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी अमोनियम बाय-कार्बोनेट पावडरचे वितरण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.

फाउंडेशनच्या वतीने या सर्व गोष्टींचा होणाऱ्या परिणामावर आधारित माहितीपट तयार कारण्यात आला. शहरातील ४०० शाळा व महाविद्यालयात माहितीपटाच्या सादरीकरण करण्यात आले. पर्यावरण गणेशोत्सव विषयक निबंध स्पर्धा आणि पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली.

विजेत्यांना सायकल, घड्याळ, स्कुल बॅग अशी बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील गणेश कलाकृतीचे वीस दिवस प्रदर्शन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ललित कला महाविद्यालयात भरविण्यात आले.

गणेश मंडळांसाठी पर्यावरणपूरक गणेश उत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालवी फौंडेशन तर्फे आवाहन
शहरातील गणेश मंडळ दरवर्षी मोठी मूर्ती स्थापन करतात . तसेच लहान मूर्ती ची स्थापना करतात. ती लहान मूर्ती पर्यावरण पूरक असावी. त्या मूर्तीचे विसर्जन हे देखील पर्यावरण पूरक पद्धतीने चौकात किंवा कृत्रिम तलावात करावे. ही लहान मूर्ती शाडू माती किंवा pop ची असल्यास स्पर्धेत सहभागी करता येणार नाही.
स्पर्धेत कुठलीही फी नाही. कुठलीही वयोमर्यादा नाही. मंडळांसाठी आकर्षक बक्षिसे. नियम व अटी सर्वांना सारख्या असतील

गणेश कलाकृती व सजावटीचा फोटो १३ ते १५ सप्टेंबर पर्यंत ९८३४५६४४५४ या नंबरवरती व्हाटसअँप करावयाचा आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!