Photogallery : विविध सजावटीच्या कागदांना पसंती; प्लास्टिक आणि थर्माकॉलला फाटा

0

नाशिक : राज्य सरकारच्या प्लास्टिक आणि थर्माकॉल यांच्या बंदीचे परिणाम सगळीकडे दिसून येत आहेत. अगदी काही दिवसांवर आलेला गणेशउत्सव आणि त्याची सजावटीवर देखील याचा चांगलाच परिणाम झाला आहे.

गणपती सजावटी साठी पर्याय म्हणून शहरातील बाजारात कापडांपासून तयार केलेले आकर्षक सजावटीचे साहित्य  विक्रीसाठी दाखल झाले आहे.

(व्हिडीओ : सतीश देवगिरे )

यामध्ये लाइक्रा कापड, कॉटन फुल, फायबर माळ ,कार्डशीट कागद या वस्तूंचा वापर करून यंदा गणेशउत्सव सजावटीचे साहित्य तयार करण्यात आले आहे. साहित्याचे दर सरासरी २ फूट १०००रु., ३फूट २०००रू.,४फूट ३०००ते ३५०० रू., ५ फूट ८००० रू.पासून पुढे या दरात बाजारात उपलब्ध आहे.

ग्राहकांना हवे त्या प्रकारचे साहित्य आम्ही तयार करून देतो. कापडापासून तयार केलेले साहित्य हे तीन ते चार वर्ष टिकत असल्याने ग्राहकांचा या साहित्य खरेदी कडे चांगला कल आहे. -फरहान शेख

संकलन : अनिरुद्ध जोशी, पूजा ठुबे, मोहन कानकाटे, गौतम जगताप

LEAVE A REPLY

*