Type to search

नाशिक

नाशिकमध्ये ‘गांधी उत्सवा’ला उत्साहात प्रारंभ

Share

नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त येथील कुसुमाग्रज स्मारकात आयोजित गांधी उत्सव कार्यक्रमाचे आणि गांधी चित्र प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जीवन उत्सव परिवाराचे गौतम भटेवरा, श्रीकांत नावरेकर, सुहासिनी खरे, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे अधिकारी पराग मांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, जीवन उत्सव परिवार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ३० सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात गांधी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शकली ११ ते रात्री ८.३०  दरम्यान नाशिककरांना लाभ घेता येईल. दरम्यान आज सकाळपासून नाशिकमधील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसह असंख्य नाशिककरांनी गांधी उत्सवातील गांधी चित्र प्रदर्शन, गांधी फिल्म्स यासह कापूस ते कापडापर्यंत हे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली.

येथील विशाखा सभागृहात सकाळच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध शाळा, महाविद्यालयातील तरुण तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महात्मा गांधींच्या जीवन विचारावर हिरीरीने विचार मांडले. कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात ०२  ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान, चर्चासत्र, मुक्तनाटिका, गांधी भजने, पथनाट्य यासारख्या भरगच्च कार्यक्रमांचा लाभ नाशिककरांना घेता येणार आहे.

प्रवेशद्वारावरील गांधीजींचा चष्मा ठरतोय आकर्षण
कुसुमाग्रज स्मारकात प्रवेशद्वारावर महात्मा गांधीजींच्या प्रसिध्द चष्म्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून, गांधी उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला या प्रतिकृतीतून प्रवेश करावा लागतो. महात्मा गांधींनी जगाला दिलेली अहिंसा, सद्भावना, करुणा, समता, स्वच्छता, स्वावलंबन या तत्वांची दृष्टी सर्वांना प्राप्त व्हावी या उदात्त उद्देशाने हा चष्म्या येथे मांडला आहे. या चष्म्याभोवती तरुणांनी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

“महात्मा गांधीजी आणि त्यांच्या विचारांनी जगभरातील आता पर्यंत अनेक पिढ्यांना भुरळ घातली. महात्मा गांधींच्या आश्रमात माझं बालपण गेलं, त्या महात्म्याच्या मांडीवर बसण्याचे भाग्य मला लाभले होते. आजही गांधी विचारांचा पगडा जगभर कायम आहे. आज या गांधी उत्सवात अनेक लहान मुले आणि तरुणांनी ज्या उत्स्फूर्त पद्धतीने गांधी समजून घेण्यात रस दाखवला, त्यावरून येणाऱ्या पिढ्याहि गांधी विचार आणि तत्वांचा वारसा पुढे नेतील यात मला तरी शंका नाही.

असे आहेत 01 ऑक्टोबरचे कार्यक्रम

दिनांक 01  ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते १० दरम्यान विद्यार्थ्यांच्या संयोजनाने केटीएचएम कॉलेजच्या जिमखाना मैदान येथे गांधीजींचे विशाल रेखाचित्र आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सकाळी ११ ते दु. ३ दरम्यान पथनाटय स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न होईल. सायंकाळी ६ ते ८.३० दरम्यान याच सभागृहात ‘गांधीजी : सरळ आणि गहन’ या विषयावर ज्येष्ठ गांधी विचारक रमेश ओझा यांच्या विचारांचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर इचलकरंजी येथील स्मिता पाटील नाट्यमंडळातर्फे ‘ गांधींचं करायचं काय?’ ही मुक्तनाटिका सादर होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!