Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अखेर फूल विक्रेत्यांचे स्थलांतर; सराफ बाजार, मेनरोड भागात कारवाई

Share

नाशिक । शहरातील सराफ बाजार परिसर व मेनरोड भागात रस्त्यावर विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाचा फटका नागरिक व वाहनांना बसत आहे. तसेच याचा मोठा फटका या भागातील व्यावसायिकांना बसला आहे. याचा पार्श्वभूमीवर महापालिका अतिक्रमण विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आज सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवित मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केलेे. या कारवाईमुळे आज सराफ बाजारातील 30 ते 40 फुल विक्रेत्यांचे गणेशवाडी भाजीमार्केटच्या मोकळ्या जागेवर स्थलांतर महापालिकेकडून करण्यात आले असून याठिकाणी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे.

शहरातील सराफ बाजार परिसरात होणार्‍या अस्वच्छतेमुळे पाणी तुंबण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. याठिकाणी पाणी तुंबून व्यावसायिकांचे अनेकवेळा मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे अलिकडेच सराफ व्यावसायिक व इतर दुकानदाराने एकत्र येऊन महापालिकेवर गंभीर आरोप केले होते. तसेच शहरातील भूमिगत गटार व पावसाळी गटार कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याभागातील व्यावसायिकांनी केला आहे.

तसेच गेल्या काही वर्षात मेनरोड भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. हीच अवस्था धुमाळ पाईंट ते पिंपळचौक याभागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्त्याने पायी चालणे अवघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता सराफ बाजार परिसरात रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण निमुर्लन पथकाने नाशिक पश्चिम विभागातील सराफ बाजार व मेनरोड या भागात धडक कारवाई केली. यात याभागात रस्त्यावर व वाहतुकीस अडथळा करणार्‍या विक्रेत्यांची अतिक्रमणे काढत रस्ता मोकळा केला.

पोलीस बंदोबस्तात झालेल्या कारवाईत पथकाने 2 हातगाडया, 3 बोर्ड, 3 टेबल, 5 जाळी, 1 स्टँड, 3 जाहीरात बोर्ड, 17 बरणी, 5 स्टुल, 1 खुर्ची, 3 छत्री-छत्री स्टँड, 1 लेडीज स्वेटर, 52 लेडीज सिंगल चप्पल, 2 बाकडे, 2 पायरी स्टँड, 1 लो. बॉक्स, 2 बॉक्स, 1 कटलरी गोठोडे, 1 कॅरेट, 1 चौरंग आदी साहीत्य जप्त केले. त्यानंतर हा जप्त केलेले साहित्य ओझर जकात नाका अतिक्रमण गोडावून या ठिकाणी जमा करण्यात आले.

आजच्या कारवाईच्या दरम्यान फुलबाजार स्थलांतराबाबत झालेल्या ठरावासंदर्भात फुल विक्रेत्याशी अधिकार्‍यांनी चर्चा केली. याप्रसंगी या विक्रत्यांनी गणेशवाडी भाजीमार्केटच्या मोकळ्या जागेत जाण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर सराफ बाजारातील सुमारे 30 ते 40 विक्रेत्यांचे पंचवटी विभागातील गणेशवाडी भाजीमार्केट मध्ये स्थलांतरण करण्यात आले. याठिकाणी या विक्रेत्याने आपली दुकाने देखील थाटली.

पूर्वीचे ठिकाण नागरिकांसाठी सोयीचे होते. हे ठिकाण गैरसोयीचे आहे. या परिसरात पूल बाजार हलवणे हे अडचणीचेच झाले आहे.
– शशिकांत पगार

पूर्वीच्या बाजारापेक्षा हा बाजार चांगला आहे. मात्र त्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्याठिकाणी व्यावसायिकांना रस्त्यावर बसावे लागत होते. इथे तो प्रश्न राहणार नाही हक्काची जागा मिळेल.
– ललिता भालेराव

भाजी बाजारासारखे या व्यावसायिकांना धरसोड करु नये. त्यांना स्थिर जागा द्यावी. या जागेवरही चांगले आहे. मात्र येतील घाण व भिकार्‍यांचा अड्डा अगोदर हटवावेत.
– गणेश भालेराव

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!