Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी; महाराष्ट्रासह हरियाणात आजपासून आदर्श आचारसहिंता लागू

Share

नाशिक l प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.
आज दुपारी बारा वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद परिषद पार पडली यावेळी दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त  सुनील अरोरा यांनी केली.

निवडणूक आयुक्त  सुनील अरोरा यांनी केलेल्या घोषनेनुसार महाराष्ट्रात आणि हरियानात २१ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडेल. तसेच  महाराष्ट्र व हरियाणा मतमोजणीचीा प्रक्रिया विधानसभा निहाय २४ तारखेला होणार आहे.

महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख मतदार असून राज्यात दोन पर्यवेक्षक पाठवले जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ०९ नोव्हेंबर पर्यंत , तर हरियाणा ची मुदत २ नोव्हेंबरला  संपणार आहे. त्यामुळे येत्या ०२ नोव्हेंबर पूर्वी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषद दिली आहे.

महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम : 

 • महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान.
 • मतदारसंख्या : ८ कोटी ९४ लाख
 • २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला मतमोजणी
 • महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हिएम मशीन
 • ०४ ऑक्टोंबरअर्ज भरण्याची अंतिम मुदत

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना: 

 •  एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान
 • गोंदिया गडचिरोली साठी निवडणूक आयोगाची विशेष सुरक्षा व्यवस्था
 • उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवाराने एकही कॉलम रिकामा ठेवला तरी अर्ज बाद करण्यात येणार आहे.
 • उमेदवारांना २८ लाख रुपयापर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
 • प्लास्टिक मुक्त प्रचारसाहित्य  वापरण्याची सूचना
 •  उमेदवारांना गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!