Type to search

जिल्हा ग्रामिण पोलीस दलातर्फे स्पर्धा परिक्षांचे मोफत मार्गदर्शन

नाशिक

जिल्हा ग्रामिण पोलीस दलातर्फे स्पर्धा परिक्षांचे मोफत मार्गदर्शन

Share

नाशिक । जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने स्पर्धा परिक्षा तसेच पोलिस, सैनिक भरतीसाठी प्रयत्त्न करणार्‍या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस स्टेशननिहाय केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये युवकांना ग्रामीण ग्रामीण पोलिस दलातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेचा लाभ सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. 2018-19 मध्ये राज्यात होणार्‍या विविध भरती प्रक्रियांसाठी हे भरतीपूर्व प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा नाशिक जिल्हा पोलिस क्रिडा स्पर्धे दरम्यान करण्यात आली होती. मंगळवारी (दि.4) प्रत्यक्षात या उपक्रमाची सुरूवात झाली. आज, मंगळवारी पेठ तालुक्यातील दादासाहेब बिडकर कॉलेज येथे अधिक्षक दराडे यांच्या हस्ते तर पेठ उपविभागाचे पोलिस उपअधिक्षक सचिन गोरे, पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडगर, प्राचार्य डॉ. आर. बी. टोचे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी जवळपास 300 विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांना दराडे यांनी मार्गदर्शन केले.

नागरिकांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान, मालेगाव विभागाचे अपर पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनीही आज, मंगळवारी मालेगाव शहरातील एमएसजी कॉलेजमध्ये स्पर्धा परिक्षा तसेच पोलिस व सैनिक भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपअधिक्षक रत्नाकर नवले अजीत हगावणे यांच्यासह इतर उपस्थित होते. अपर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी निफाड तालुक्यातील सायखेडा येथील स्वामी षटकोपाचार्य महाराज कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत परिक्षा व भरती प्रक्रियेतील अडचणी त्यावरील उपाय याबाबत अवगत केले. यावेळी पोलिस खेळाडूंनी प्रात्यक्षीके सादर केली.

यावेळी पोलिस उपअधिक्षक माधव पडीले, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, कळवणचे उपअधिक्षक सदाशिव वाघमारे यांनी कळवण कॉलेजमध्ये तर नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक अतुल झेंडे यांनी ओझर येथील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मनमाडच्या सहायक पोलिस अधिक्षीका आर. रागसुधा यांनी तसेच मालेगाव उपविभागाचे उपअधिक्षक शशिकांत शिंदे यांनी उपविभागातील कॉलेजांमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निरसन करून मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील 28 महाविद्यालयांमध्ये लाभ
ग्रामिण भागातील तरूणांना स्पर्धा परिक्षा तसेच पोलीस भरती परिक्षांचे योग्य मागर्दशन मिळत नाही. त्यांना मदत व्हावी यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कॉलेजच्या प्राचार्यांशी संपर्क साधून वेळ निश्चित करण्यात येणर आहे. जिल्ह्यातील 28 महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण पार पडणार आहे, याचा युवकांसह तरूणांनी लाभ घ्यावा.

– संजय दराडे, पोलिस अधिक्षक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!