खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत चार संघ उपांत्य फेरीत

0

नाशिक । प्रतिनिधी
खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत बिटको, टी.जे.चव्हाण , सिडको, यशवंत या संघांनी शानदार खेळ करत उपउपांत्य फेरीचे सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दरम्यान आज उत्तराखंडच्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी अधिकारी आंचल बावा यांनी स्पर्धेस सदीछा भेट देवून खेळाडूंचे प्रोत्सहान वाढवले.

यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने सुरु असलेल्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धाच्या आजच्या दुसर्‍या दिवशी 17 वर्षे मुलांमध्ये डी. डी. बीटको, टी.जे.चव्हाण, सिडको आणि यशवंत संघ यांनी आपले उपउपांत्य सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 14 वर्षे मुलांमध्ये राणे नगरच्या सेंट फ्रान्सिस शाळा आणि टी.जे.चव्हाण या संघांनी आपले उपांत्य सामने जिंकून या गटात अंतिम फेरी गाठली.

या स्पर्धांचे आयोजन यशवंत व्यायाम शाळेचे माजी सभासद स्वर्गवासी शैलेंद्र क्षीरसागर आणि स्वर्गवासी जेम्स ऍंथोनी यांच्या स्मुती प्रित्यर्थ करण्यात आले आहे. या स्पर्धेला उत्तराखंड ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी अधिकारी आंचल बावा यांनी भेट दिली.यावेळी शिव छत्र पती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, दिलीप घोडके, खो-खो चे संघटक मंदार देशमुख, नितीन हिंगमीरे, आदी उपस्तीत होते, या स्पर्धेचे संयोजक आनंद खरे यांनी सर्वांचे स्वागत केले तर अविनाश खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.

आंचल बावा यांनी या स्पर्धेची प्रसंशा केली आणि संघातले की या वयापासून या मुलांना खेळाचे धडे मिळण्यास खेळाडूची योग्य दिशेने वाटचाल होण्यास मदत होते असे सांगितले. उद्या या दोन्हीही गटांचे अंतिम सामने होणार असून त्यानंतर विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. उद्या होणारे सामने

आजचा निकाल
मुले 14 : 1) अंतिम सामना – सेंट फ्रान्सिस स्कुल विरुद्ध टी जे चव्हाण स्कुल,
17 मुले : -उपांत्य सामने- 1) टी जे चव्हाण विरुद्ध यशवंत संघ, 2) डी. डी. बीटको विरुद्ध सिडको संघ.
मुली : 14 – 1) सिडको संघ विरुद्ध टी जे चव्हाण स्कुल
मुली : 17 – 1 )वाय . डी. बीटको विरुद्ध रेणुका संघ, नाशिक रोड.

 

LEAVE A REPLY

*